esakal | चिंताजनक! राजापुरात 21 शाळा व्हेंटिलेटरवरच

बोलून बातमी शोधा

school rooms damage in ratnagiri education marathi news

गतवर्षी कोरोनामुळे शाळा बंद होत्या. शाळा सुरू झाल्यानंतर अशा नादुरूस्त शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसविणे धोक्‍याचे ठरणार आहे.

चिंताजनक! राजापुरात 21 शाळा व्हेंटिलेटरवरच
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राजापूर (रत्नागिरी) : तालुक्‍यातील 21 शाळांच्या 55 खोल्या नादुरुस्त असून सद्यस्थितीमध्ये धोकादायक झाल्या आहेत. या शाळांच्या इमारतींची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती न झाल्यास त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना बसविणे धोकादायक ठरणार आहे. मुलांवर पावसाचे पाणी गळणार आहे. त्यामुळे या शाळांच्या इमारतींची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे. पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून धोकादायक शाळांची यादी वरिष्ठांकडे पाठविली आहे. या शाळांच्या दुरुस्तीला निधीची प्रतीक्षा आहे. 

प्राथमिक शाळांच्या अनेक इमारतींची गेल्या काही वर्षात दुरुस्ती न झाल्याने अशा इमारतीतील वर्गखोल्या मोडकळीस आल्या आहेत. अनेक इमारतींच्या भिंतीना तडे गेले आहेत. प्राथमिक शाळांच्या स्लॅबच्या षटकोनी इमारतींना मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. पावसाळ्यात अशा वर्गखोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना बसवणे मुश्‍किल आहे. पावसाळ्यापूर्वी या शाळा इमारतींची दुरुस्ती न झाल्यास विद्यार्थ्यांना अन्यत्र बसवावे लागणार आहे. 

गतवर्षी कोरोनामुळे शाळा बंद होत्या. शाळा सुरू झाल्यानंतर अशा नादुरूस्त शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसविणे धोक्‍याचे ठरणार आहे. पंचायत समिती सदस्य अभिजित तेलीसह अन्य सदस्यांनी पंचायत समितीच्या आढावा बैठकीमध्ये केलेल्या सूचनेप्रमाणे नादुरुस्त शाळांचे सर्व्हेक्षण करून त्याची यादी जिल्हा परिषदेला सादर केली आहे. 

हेही वाचा- परमबीर सिंग यांना मुख्य आरोपी करणे केंद्र सरकारला मान्य नसावं

तालुक्‍यातील पेंडखळे शाळेसह अनेक शाळांच्या इमारती नादुरुस्त झाल्याने धोकादायक बनल्या आहेत. तातडीने अशा धोकादायक शाळांचे सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना शिक्षण विभागाला देण्यात आल्या असून त्याप्रमाणे कार्यवाही सुरू आहे. तातडीने जिल्हा परिषदेनेही निधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. 
- अभिजित तेली, शिवसेना गटनेता, पंचायत समिती 

धोकादायक छप्पर असलेल्या शाळा 
पेंडखळे नं.1, उन्हाळे गंगातिर्थ नं.1, हातिवले नं.1, जुवाठी, कारवली नं.1, ओशीवळे नं.1, धोपेश्वर नं.1, तुळसुंदे, पांगरे बु.नं.1, गोठणे-दोनिवडे नं.2, पन्हळे तर्प राजापूर, वाडीखुर्द, तुळसवडे नं.1, अणसुरे आडाभराडे, सौंदळ नं.1, वाडापेठ, वाडाभराडे, चौके, वाटूळ नं.4, रायपाटण नं.3, मंदरूळ नं.1  

संपादन- अर्चना बनगे