सावधान : शालेय विद्यार्थीही हृदयविकाराच्या विळख्यात....

School Students Are Also Heart Attack In Ratnagiri Kokan Marathi News
School Students Are Also Heart Attack In Ratnagiri Kokan Marathi News

रत्नागिरी : शालेय विद्यार्थी हृदयविकारासह इतर गंभीर आजारांच्या फेऱ्यात अडकल्याचे पुढे आले आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य सुरक्षा कार्यक्रमाअंतर्गत अंगणवाडी आणि शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी अहवालामध्ये ही बाब स्पष्ट झाली. या कार्यक्रमाअंतर्गत अंगणवाडी आणि शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये ३१८ विद्यार्थी इतर शस्त्रक्रियेसाठी तर ३९ विद्यार्थ्यांना हृदयाचे विकार असून यापैकी २२ विद्यार्थ्यांवर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया केली आहे. 

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य सुरक्षा अभियाना अंतर्गत जिल्ह्यातील अंगणवाडी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शालेय आरोग्य तपासणी केली जाते. डिसेंबर २०१९ अखेर जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी पूर्ण करण्यात आली. शाळांमधील १ लाख ५२ हजार २८२ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी पूर्ण केली आहे. तर अंगणवाडी स्तरावरील १ लाख ७ हजार ५१९ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली आहे. तपासणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी २४ हजार ३५० विद्यार्थ्यांवर शाळेमध्येच औषध उपचार पुरवण्यात आले आहेत.

३०० विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया

संदर्भसेवेसाठी खास शिबिरे घेण्यात आली. ७ हजार ९०२ विद्यार्थ्यांना संदर्भ सेवेकरीता निवडले होते. यापैकी ७ हजार ६५२ विद्यार्थ्यांवर संदर्भ सेवेमध्ये उपचार करण्यात आले. 
संदर्भसेवा शिबिरामध्ये तपासणी अंती अंगणवाडीमधील ७३ विद्यार्थी सॅम श्रेणीतील तर ६९५ विद्यार्थी मॅम श्रेणीतील असल्याचे आढळून आले. ३१८ विद्यार्थ्यांना इतर शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरवण्यात आले. यापैकी ३०० विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया केली आहे.

३९ विद्यार्थ्यांना हृदयरोगाने ग्रासले

यामध्ये अंगणवाडीतील १३९ जणांवर तर पहिली ते बारावीपर्यंतच्या १७९ जणांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. १६ विद्यार्थ्यांवर अद्याप शस्त्रक्रिया करणे बाकी आहे. या विद्यार्थ्यांना हर्निया, ॲपेंडिक्‍स, इएनटी, हृदयरोग यासारखे आजार झाल्याचे निदान करण्यात आले. तपासण्यात आलेल्या विद्यार्थ्यांपैकी ३९ विद्यार्थ्यांना हृदयरोगाने ग्रासल्याने त्यांना हृदय शस्त्रक्रियेसाठी संदर्भात करण्यात आले. यापैकी २२ विद्यार्थ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. हृदयाचे रोग लहान विद्यार्थ्यांना बळावत असल्याने हा चिंतेचा विषय ठरत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com