भारीच : शाळेला सुट्टी, बट लर्न फ्रॉम होम विथ मल्टिमिडीया.... सुट्टी नाॅट..

भारीच : शाळेला सुट्टी, बट लर्न फ्रॉम होम विथ मल्टिमिडीया.... सुट्टी नाॅट..

 रत्नागिरी : कोरोनामुळे शाळा बंद होऊन मूल घरात आठवड्यापासून बसली आहेत शाळा बंद असली तरी अभ्यास बंद नको म्हणून संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या कोळंबे नं-१ या उपक्रमशील शाळेत  उपक्रमशील शिक्षक श्री पंडितराव ढवळे सौ रसिका शिंदे यांनी लर्न फ्रॉम होम विथ मल्टिमिडीया हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमास गटशिक्षणाधिकारी शशिकांत त्रिभुवणे केंद्रप्रमुख प्रकाश कळंबटे अशोक माने यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

कोरोनामुळे मिळालेल्या सुट्टीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी हा उपक्रम आदर्शवत व कौतुकास्पद ठरत आहे. पालकांनी याला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे.  मुलांचा बराचसा वेळ घरातच ऑनलाईन व ऑफलाईन शिकण्यात जातो. तसेच समूहावर पाठवलेली पी डी एफ पुस्तके अभ्यासानंतर मुलं आनंदाने वाचतात. चित्र काढतात, हस्तकलेच्या वस्तु बनवतात सर्व पालक आपल्या मुलांच्या ऍक्टिव्हिटी,नाटक,गाणी,डान्स हे शूट करून ग्रुपवर टाकत आहेत. यामुळे इतर मुलांनाही नवनवीन गोष्टी माहिती होत असून वेगवेगळ्या विषयांची व विचारांची देवाणघेवाण होत आहे. त्याचा शाळेतील इतर  मुलांना निश्चित फायदा होत आहे.   

अशी आहे शिकवण्याची पध्दत

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळंबे नं-१ शाळेचा LEARN FROM HOME WITH MULTIMEDIA या नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी उपक्रमशील शिक्षक श्री  पंडितराव ढवळे व सौ रसिका शिंदे यांनी आजी माजी पालकांचा व विद्यार्थ्यांचा मी शाळेचा कोळंबे शाळा माझी असा व्हाट्सअप्प ग्रुप तयार केला आहे या ग्रुपवरती  या उपक्रमाअंतर्गत मुलांची शैक्षणिक गुणवत्ता टिकविण्यासाठी आणि वाढविण्यासाठी व्हाट्सएप, ई-मेल, टेक्स्ट, मॅसेज, फेसबुक व व्हिडिओ  कॉन्फरन्सच्या माध्यमातून सतत प्रयत्न केले जात आङेत.

असाही आधार
कोरोनाने सर्वत्र थैमान घातले आहे अशा परिस्थितीत मुलांची पुढील पंधरा ते वीस दिवस काळजी घेणे खूप महत्वाचे आहे म्हणून व्हाट्सअप्प समूहावरती कोळंब्यातील पालकांना व मुलांना अभ्यासाबरोबरच कोरोनाची अचूक माहिती देऊन स्वतःची काळजी कशी घ्यावी यासाठी जागरूक केले जाते. दररोज अभ्यासातील बदल कळवळा जातो.काही अडचण असल्यास पालक शिक्षक एकमेकांना संपर्क करतात.

साहित्यांचा जणू खजिनाच
 १९७१ सलापासूनचे किशोरचे अंक ऑनलाईन मोफत उपलब्ध असलेले. तब्बल ३२ हजार पानांचे रंगीबेरंगी साहित्य,  उपल्बध असलेले. कथा, कविता,ललित लेख, एकांकिका, नाट्यछटा,चित्रकथा, कोडी आणि हजारो चित्र यांचा हा खजिना असलेले. हे साहित्य कोळंब्यातील मुलांना मिळावे यासाठी.पालकांना लिंक पाठवून ऑनलाईन डाउनलोड करा किंवा प्रिंट काढून मुलांना द्या.त्यातील गोष्टी, कविता वाचून दाखवा. त्यावर चर्चा करा. एकत्र बसून कोडी सोडवा.हे सांगितले आहे.

पालकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
कराओकेवरती कविता, गाणी लिंकद्वारे मुले पाहतायत आणि अभ्यासतायत तसेच अंक वाचन, अंक लेखन, चित्र काढणे, रंगविणे व इंग्लिश वाचन यासारख्या ऍक्टिव्हिटी साठी पंडितराव ढवळे यांनी ऑफलाईन अँप्स जी मुलांना हाताळायला सोपी जातील अशी अनेक अँप्स लिंकद्वारे उपलब्ध करून दिली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com