esakal | सोमवारपासून वाजणार शाळांची घंटा 
sakal

बोलून बातमी शोधा

School will start from Monday

विद्यार्थ्यांसाठी पालकांची लेखी संमती अत्यावश्‍यक केली आहे

सोमवारपासून वाजणार शाळांची घंटा 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी - कोरोना कालावधीत बंद असलेल्या शाळा 23 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. 9 वी ते 12 वीपर्यंतच्या जिल्ह्यात 458 शाळा असून 83 हजार 136 विद्यार्थी आहेत. शाळांमधील 5 हजार 590 शिक्षकांची कोरोना चाचणी सुरू असून आता ऍण्टिजेनलाही मान्यता दिली आहे. विद्यार्थ्यांसाठी पालकांची लेखी संमती अत्यावश्‍यक केली आहे. विद्यार्थ्यांची थर्मल व ऑक्‍सिमीटरद्वारे तपासणी करावी लागणार आहे. 

माध्यमिक शिक्षण विभागाकडून शाळांसाठी नियोजन सुरू असून गुरुवारी (ता. 18) व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये माध्यमिक शिक्षणासह आरोग्य विभागाला सूचना दिल्या. शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात ऍण्टिजेन कीटची व्यवस्था केली आहे. परंतु दुर्धर आजारासह सर्दी, ताप, खोकला असलेल्यांना आरटीपीसीआर करावी लागेल. 

जे विद्यार्थी शाळेत येणार नाहीत, त्यांना ऑनलाइन शिक्षणाची व्यवस्था करावी, अशा सूचना दिल्या. 

शाळेची वेळ ठरवण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापक यांना दिले आहेत. इंग्रजी, गणित आणि विज्ञान या तीन विषयांवर सर्वाधिक भर आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःची पाण्याची बाटली आणणे. शाळा सॅनिटाईज करायची आहे. जिल्ह्यात 9 वीचे विद्यार्थी 22 हजार 579, 10 वीचे 23 हजार 328, 11 वीचे 17 हजार 726, 12 वीचे 19 हजार 503 विद्यार्थी आहेत. 

हे पण वाचा -  पक्षिय पातळीवर उमेदवार निवडीच्या हालचाली सुरू; भाजप अध्यक्षांचा दौरा, कॉंग्रेसतर्फे बैठक

ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थी शहरी भागात येत असल्यामुळे त्यांच्यासाठी एसटी बसेसची व्यवस्था करावी, असे पत्र जिल्हा परिषदेकडून एसटी महामंडळाकडे पाठविण्यात आले आहे. 

माध्यमिक शिक्षकांच्या कोरोना तपासणीसाठी जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. त्या दृष्टीने नियोजन प्राथमिक आरोग्य केंद्रावर केले आहे. 
- रोहन बने, अध्यक्ष, जिल्हा परिषद 

कोरोनानंतर शाळा सुरू होत असल्यामुळे पालकांनी शिक्षण विभागाला पूर्णतः सहकार्य करावे. शिक्षण विभागाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. 
- सुनील मोरे, शिक्षण सभापती 

शाळेत हे बंधनकारक..आवश्‍यक 
शाळेत विद्यार्थ्यांना मास्क असेल अत्यावश्‍यक 
नियमित थर्मल व ऑक्‍सिजन तपासणी बंधनकारक 
कोविडसदृश लक्षणे असल्यास आरोग्य केंद्रामार्फत तपासणी 
 
 संपादन - धनाजी सुर्वे 
 

loading image
go to top