मालवणात शाळकरी मुलगा बेपता

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

मालवण - शहरातील धुरीवाडा येथे शिक्षणानिमित्त वास्तव्यास असलेला हर्षल नीलेश पणदुरकर (वय १३, मूळ रा. तारकर्ली-देवबाग) हा शालेय विद्यार्थी कालपासून बेपत्ता झाला आहे. याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मालवण - शहरातील धुरीवाडा येथे शिक्षणानिमित्त वास्तव्यास असलेला हर्षल नीलेश पणदुरकर (वय १३, मूळ रा. तारकर्ली-देवबाग) हा शालेय विद्यार्थी कालपासून बेपत्ता झाला आहे. याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टोपीवाला हायस्कूल येथे आठवी वर्गात शिक्षण घेत असलेला हर्षल शिक्षणानिमित्त धुरीवाडा येथील आपल्या मावशीकडे राहत होता. काल सकाळी घरातून निघाला तो परत आला नाही. तो यादिवशी शाळेतही गेला नाही. काल सायंकाळपासून हर्षल याचा शोध वडील नीलेश, काका सदा व आनंद यांच्यासह रमेश कद्रेकर, योगेश सारंग, नाना तांडेल, मकरंद चोपडेकर, आशिष केळुसकर यांच्याकडून सुरू होता.

काल रात्री नातेवाइकांनी येथील पोलिस ठाण्यात धाव घेत हर्षल बेपत्ता असल्याची माहिती दिली. शहरात बसवलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेतून हर्षल याचा शोध घेण्याची मागणी केली; 
मात्र सिसिटीव्ही यंत्रणा बंद असल्याने नातेवाइकांनी स्वतःहून शोध मोहीम सुरू केली. पोलिस यंत्रणेने हर्षल याचे घरातील दप्तर तपासले असता त्यात मी कोल्हापूर येथे स्वतःच्या नोकरीला जात असल्याची चिठ्ठी सापडली आहे.

हर्षल बेपत्ता असल्याची माहिती वडील नीलेश यांनी येथील पोलिस ठाण्यात दिली आहे. हर्षल हा अल्पवयीन असल्याने त्याच्या बेपत्ता प्रकरणी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  हर्षल याचे नातेवाईक शोध घेत कणकवलीत पोचले असता रेल्वे स्थानकात हर्षल याची सायकल दिसून आली. काल दुपारी तुतारी एक्‍स्प्रेस मधून हर्षल मुंबईच्या दिशेने गेल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले.

Web Title: Schoolboy missing in Malvane