
Pali News
Sakal
पाली : दहा दिवसांच्या गणरायाचे विसर्जन झाले आणि काही दिवसांपूर्वी श्रावण देखील संपला आहे. त्यामुळे आता खवय्यांच्या उड्या मासळीवर पडत आहे. तसेच समुद्रात मासेमारीसाठी होड्या देखील जात आहेत. परिणामी जिल्ह्यात सध्या समुद्रातील मासेमारी जोरात सुरू आहे. मोठ्या प्रमाणात मासळी सापडत आहे. त्यामुळे मासळीची आवक वाढली आहे.