esakal | सातार्डामध्ये मोटारीतून दारूसाठा जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

banda

Sindhudurga : सातार्डामध्ये मोटारीतून दारूसाठा जप्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बांदा : गोव्यातून सातार्डामार्गे जिल्ह्यात होणार्‍या बेकायदा दारु वाहतुकी विरोधात राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर भरारी पथकाने आज कारवाई केली आहे. यात रॉयल ब्रँड व्हिस्कीच्या 75 खोक्यामधून एकूण 3600 बाटल्या जप्त करण्यात आल्या. दारु व दारु वाहतुकीसाठी वापरलेली स्विफ्ट मोटार (एमएच 02 एलडी 6651) असा एकूण 7 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. याप्रकरणी साईनाथ तात्या पवार (वय 35, रा. बांबर्डे तर्फ माणगाव, ता. कुडाळ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सातार्डा रवळनाथ मंदिरसमोर आज करण्यात आली.

ही कारवाई कोल्हापूर विभागीय उपायुक्त यशवंत पवार यांच्या आदेशान्वये निरीक्षक पी. आर. पाटील, उपनिरीक्षक आर. जी. येवलुजे, के. डी. कोळी, सहाय्यक दुय्यम निरीक्षक प्रदीप गुरव, जवान सुशांत बनसोडे, अमोल यादव, विलास पवार व दीपक कापसे यांच्या पथकाने केली. पुढील तपास निरीक्षक पी. आर. पाटील करीत आहेत.

याठिकाणी गस्त घालत असताना मोटारीची तपासणी करण्यात आली. त्यावेळी मोटारीच्या मागील डिकीत व पाठीमागील सीटवर बेकायदा गोवा बनावटीच्या दारूचे खोके आढळले. सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

loading image
go to top