esakal | कोकण : बाजार समितीकडून काजू व्यावसायिकांना सहकार्याची भूमिका

बोलून बातमी शोधा

sellers and dealers of cashew in konkan meeting with nilesh rane in ratnagiri

गेल्या काही महिन्यांपासून परजिल्ह्यातील बाजार समितीकडून जाचक कर वसुली होत असल्याची तक्रार काजू व्यावसायिक आणि प्रक्रिया उद्योग करणाऱ्या व्यवसायिकांनी केली होती.

कोकण : बाजार समितीकडून काजू व्यावसायिकांना सहकार्याची भूमिका
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : काजू व्यावसायिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीचे सभापती व अधिकरी यांच्याशी झालेल्या बैठकीत बाजार समितीने काजू कारखानदार व व्यवसायिकांशी सहकार्याची भूमिका घेतली आहे. निलेश राणे यांनी केलेल्या मध्यस्तीमुळे काजू प्रक्रिया व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून परजिल्ह्यातील बाजार समितीकडून जाचक कर वसुली होत असल्याची तक्रार काजू व्यावसायिक आणि प्रक्रिया उद्योग करणाऱ्या व्यवसायिकांनी केली होती. त्यावर रत्नागिरी बाजार समितीचे सभापती संजय आयरे यांनी माजी खासदार निलेश राणे यांची भेट घेतली. यावेळी काजू व्यावसायिक व प्रक्रिया उद्योजकही उपस्थित होते.

हेही वाचा - आवड असली की सवडही मिळते; टाकाऊ वस्तूंपासुन तयार केला बगीचा

व्यावसायिक आणि उद्योजकांनी बाजार समितीकडून दोन वेळा घेतला जाणारा सेस, वेअरहाऊसची उपलब्धता, ग्रेडिंग आणि पिलिंग प्लांट आदी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यावर माजी खासदार यांनी सभापतींना काजू व्यावसायिक आणि प्रक्रिया उद्योजकांना सुविधा उपलब्ध करून द्यावेत आणि प्रश्न प्राधान्याने सोडवावे अशी सूचना केली. सभापती संजय आयरे याने निलेश राणे यांच्या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद दिला.  लवकरच व्यावसायिकांचे प्रश्न सोडविण्याचे अभिवचन दिले. यावेळी व्यावसायिक आणि प्रक्रिया उद्योजकांनी निलेश राणे यांचे आभार मानले. संजय आयरे यांचेही आभार मानले. 

यावेळी काजू प्रक्रिया उद्योग संघटनेचे अध्यक्ष श्री. बारगिर, काजू उद्योजक रविकिरण करंदीकर, संदेश दळवी, ऋषिकेश परांजपे तसेच बाजार समितीचे सचिव प्रमोद मोहिते, लिपिक मंदार सनगरे, नाके सहायक आशिष वाडकर उपस्थित होते. यावेळी उद्योजकांनी खंडित झालेली तारण कर्ज सुविधा, सबसिडी आशा आदी विषयांवर निलेश राणे यांच्या सोबत चर्चा केली. हे प्रश्न तात्काळ सोडविण्यासाठी प्रयत्न करू असे निलेश राणे यांनी सांगितले.