सेना-काँग्रेसमध्ये प्रासंगिक करार सुरूच ; वर्चस्व मात्र कायम

sena congress party dominated by a nagar panchayat of dabhol in ratnagiri
sena congress party dominated by a nagar panchayat of dabhol in ratnagiri
Updated on

दाभोळ (रत्नागिरी) : दापोली नगरपंचायतीमधील शिवसेना व काँग्रेस यांच्यातील प्रासंगिक करार सुरूच असून, त्यामुळे दापोली नगरपंचायतीच्या विषय समित्यांची निवड बिनविरोध झाली. अपेक्षेप्रमाणे शिवसेना व काँग्रेसने दापोली नगरपंचायतीवरील आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.

दापोली नगरपंचायतीच्या विषय समित्यांची निवडणूक काल (२८) ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करून घेण्यात आली. पाणीपुरवठा व जलनिःस्सारण समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे नगरसेवक व उपनगराध्यक्ष प्रशांत पुसाळकर यांची तर सदस्यपदी उल्का जाधव व मंगेश राजपूरकर (शिवसेना), खालिद रखांगे (राष्ट्रवादी), जया साळवी (भाजप) यांची निवड केली. स्वच्छता व आरोग्य समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे गटनेते प्रकाश साळवी यांची तर सदस्यपदी उल्का जाधव (शिवसेना), रजिया रखांगे (काँग्रेस), सचिन जाधव (राष्ट्रवादी), जया साळवी (भाजप) यांची निवड केली. सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे केदार परांजपे यांची तर सदस्यपदी उल्का जाधव (शिवसेना), रजिया रखांगे (काँग्रेस), रवींद्र क्षीरसागर (राष्ट्रवादी),  रमा तांबे (भाजप) यांची निवड झाली. 

महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या परवीन रखांगे तर उपसभापतिपदी शबनम मुकादम (शिवसेना) यांची तर सदस्यपदी उल्का जाधव (शिवसेना) व नम्रता शिगवण (राष्ट्रवादी) यांची बिनविरोध निवड झाली. तर स्थायी समितीच्या पदसिद्ध सभापतीपदी नगराध्यक्ष परवीन शेख यांची तर सदस्यपदी प्रशांत पुसाळकर, प्रकाश साळवी, केदार परांजपे, कृपा घाग, परवीन रखांगे यांची निवड केली. सर्व नवनिर्वाचित सभापती व सदस्यांचे अभिनंदन केले आहे. या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी, दापोलीचे उपविभागीय अधिकारी शरद पवार यांनी काम पाहिले. त्यांना मुख्याधिकारी महादेव रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रवीण खरात, संदीप जाधव, अरुण जाधव यांनी काम पाहिले.

नियोजन व विकास समिती सभापतिपदी घाग

नियोजन व विकास समितीच्या सभापतिपदी शिवसेनेच्या कृपा घाग यांची, तर सदस्यपदी मंगेश राजपूरकर (शिवसेना), रजिया रखांगे (काँग्रेस), सचिन जाधव (राष्ट्रवादी), रमा तांबे (भाजप) यांची निवड झाली.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com