
रत्नागिरी : कुपोषित बालकांच्या समस्येवर मात करण्यासाठी शासनाकडून योजना राबवण्यात येतात; मात्र जनजागृतीमुळे रत्नागिरी जिल्ह्यात कुपोषित बालकांचे प्रमाण खूपच कमी आहे. सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात ५८५ कुपोषित बालके असून, ४८ तीव्र कुपोषित बालके आहेत. या मुलांना अतिरिक्त पोषण आहार देण्यासाठी ग्रामीण बालविकास केंद्र सुरू करण्यात आली आहेत. ही जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर देण्यात आली आहे. कमी कुपोषित बालकांच्या यादीत जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे.