कोकणातील शाहिरांची मुंबईकरांना भावनिक साद ; बंद केले आहेत रस्ते गावचे, दुःखी नाही व्हायचे ...

shahir emotional message to the Mumbai people kokan marthi news
shahir emotional message to the Mumbai people kokan marthi news

मंडणगड (रत्नागिरी) :कोरोना या महाभयंकर विषाणूने संपूर्ण जगाला वेढलंय. त्याला हरविण्यासाठी संपूर्ण देश झटतोय. ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव अजून झालेला नाही. तो होवू नये म्हणून शासन, प्रशासन व गावकरी काही उपाययोजना करीत आहेत. मात्र त्यात फेसबुक व व्हाट्सएप या सोशल मीडियावर गावच्या सीमा बंद केल्या म्हणून नाराजीच्या पोस्ट, मेसेज व फोटो व्हिडीओव्दारे पसरू लागलेत.

त्यामुळे कोकणातील स्थानिक मुंबईकर उद्विग्न झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. यावर लोकप्रबोधन म्हणून शाहिरांनी लेखणी उचलली असून मुंबईकरांना आवाहन करणारे असेच एक काव्य संगमेश्वर तालुक्यातील कोळंबे सोनगिरी गावच्या श्री गणेश कृपा कलामंचाच्या कवी निलेश श्रीराम रसाळ यांनी लिहिले असून शाहीर नितीन रसाळ यांनी आपल्या सुमधुर आवाजात सादर करीत कोकणातील चाकरमानी यांना भावनिक साद घातली आहे. तसेच कोरोना रोगावर जनजागृती करणारी गीते लिहिली जात आहेत.

बंद केले आहेत रस्ते गावचे 
बघून दुःखी नाही व्हायचे
कारण याच रस्त्यावर, आपले आई वडील,
कधी तरी आपली, सर्वांची वाट पहायचे

वाटत असेल त्यांनाही, असावी आपली मुलं सुखरूप
धास्तावले असेल त्यांचे ही काळीज ऐकून, या रोगाच आक्रल विक्राळ स्वरूप 

बंद केल्या आहेत सीमा गावच्या, तुमच्याच प्रेमापोटी 
अडकाल कुठे तरी मध्येच रस्त्यात या विचाराने, त्यांच्या डोळ्यात येत असेल अश्रूंची भरती ओहोटी

काढले एवढे दिवस तसे, थोडे दिवस काढा 
सरतील हे ही दिवस मग गावच्या बंद सीमेला, मोठं भागदाड पाडा

बंदच केल्या नाहीत, सीमा गाव वाल्यानी
नियम पाळले सरकारचे, कर्तव्य त्यांनी बजावल्यानी

लेकरांनो गैरसमज करून, घेऊ नका, नका विसरू मायला
जर का वेळ तशीच आलीच खुला केलाय रस्ता आपल्या गावात यायला!
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com