

Vibrant Folk Traditions: Shakti-Tura and Balya Dance in Raigad
Sakal
पाली : महाराष्ट्राला लाभलेली लोककलेची समृद्ध परंपरा विशेषतः कोकणात गणेशोत्सवाच्या काळात अधिकच चैतन्यमयी होऊन उठते. गणरायाच्या आगमनाने रायगड जिल्ह्यातील गावागावांत ढोलकीचा ताल, टाळांचा गजर आणि जाखडी नृत्याची रंगत पाहायला मिळत आहे. याच परंपरेचा अनोखा आविष्कार शुक्रवारी (ता. १८) सुधागड तालुक्यातील नाडसूर येथे अनुभवायला मिळाला. तेथे आयोजित भव्य 'शक्ती-तुरा' सामन्याने आणि बाल्या नृत्याच्या आवर्तनांनी हजारो रसिक प्रेक्षकांची मने जिंकली.