धामापूरतर्फे संगमेश्‍वर गटावर भगवाच 

Shankar Bhuvad From Shivsena Wins In Dhamapur Sangmeshwar
Shankar Bhuvad From Shivsena Wins In Dhamapur Sangmeshwar

देवरूख ( रत्नागिरी ) - जिल्ह्यातील बहुचर्चित धामापूरतर्फे संगमेश्‍वर जिल्हा परिषद गटावर शिवसेनेने पुन्हा आपला भगवा फडकावला आहे. शिवसेनेचे शंकर भुवड यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची झुंज मोडीत काढत येथून 398 मतांनी विजय मिळवला. महाविकास आघाडीनंतरही येथे शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसची लढत झाली. 

धामापूर जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीसाठी बुधवारी (ता. 11) 21 हजार 953 मतदारांपैकी केवळ 9 हजार 558 मतदारांनी आपला हक्‍क बजावला. त्यामुळे मतदानाची टक्‍केवारी केवळ 45 टक्‍क्‍यांवर राहिली. यातही 3 हजार 983 पुरूषांचा तर 55 हजार 575 महिला मतदारांचा समावेश होता. शुक्रवारी सकाळी 10 वाजता देवरूख तहसील कार्यालयाच्या सभागृहात मतमोजणीला प्रारंभ झाला. एकावेळी 10 टेबलांवर 10 केंद्रांची मतमोजणी करण्यात आली.

शिवसेनेचे भुवड यांना 4 हजार 228 मते

या गटात एकूण 31 केंद्र असल्याने चार फेऱ्या करण्यात आल्या. पहिल्या फेरीत भाजपचे अमित ताठरे यांना 916, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुशील भायजे यांना 1 हजार 33, शिवसेनेचे शंकर भुवड यांना 1 हजार 279 मते मिळाली तर नोटाला 87 लोकांनी कल दिला. पहिल्या फेरीत शिवसेनेच्या उमेदवाराला 246 मतांची आघाडी होती. दुसऱ्या फेरीत अमित ताठरे यांना 290, भायजे यांना 1 हजार 192, भुवड यांना 1 हजार 180 तर नोटाला 97 मते पडली. या फेरीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने नाममात्र 12 मतांची आघाडी घेतली. तिसरी फेरी शिवसेनेला लाभदायक ठरली. यात भाजपला 445, राष्ट्रवादी कॉंग्रेसला 1 हजार 389, शिवसेनेला 1 हजार 696 तर नोटाला 88 मते मिळाली. या फेरीत शिवसेनेने पुन्हा 307 मतांची आघाडी मिळवली. चौथी फेरी पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी लाभदायक ठरली. यात भाजपला 70, राष्ट्रवादी कॉंग्रेसला 216, शिवसेनेला 73 तर नोटाला 7 मते मिळाली. या फेरीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने 143 मतांची आघाडी मिळवली. 
भाजपचे ताठरे यांना 1 हजार 221, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भायजे यांना 3 हजार 820, शिवसेनेचे भुवड यांना 4 हजार 228 तर नोटाला 279 मते मिळाली. 

शिवसैनिकांचा जल्लोष 

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार सुहास थोरात यांनी तर सहाय्यक म्हणून नायब तहसीलदार गोसावी यांनी काम पाहिले. मतमोजणी कक्षाबाहेर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तीनही पक्षांचे समर्थक पोलिस परेड मैदानावर उपस्थित होते. विजयाची घोषणा होताच शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com