शरद पवार म्हणाले, जिल्हा बँक निवडणूक महाविकास आघाडीतर्फे लढा  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar Comment On District Bank Sindhudurg Marathi News

. जाहीर झालेल्या कर्जमाफी योजनेमध्ये खावटी कर्जाचा समावेश नसल्याने हे खावटी कर्ज माफ व्हावे, अशी मागणी पवार यांच्याकडे करण्यात आली.

शरद पवार म्हणाले, जिल्हा बँक निवडणूक महाविकास आघाडीतर्फे लढा 

कणकवली ( सिंधुदुर्ग ) - नियमीत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे व खावटी कर्जमाफी मिळावी, या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्यासह संचालकांनी बुधवारी सातारा येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी शरद पवार यांनी जिल्हा बॅंकेची निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवावी, आपण सर्वतोपरी सहकार्य करू, अशी सुचना त्यांनी दिली. 

राज्य सरकारने अलिकडेच कर्जमाफीची घोषणा केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कर्जभरणा करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्याशिवाय जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जवळपास 18 कोटींपेक्षा अधिक खावटी कर्ज घेतले आहे. जाहीर झालेल्या कर्जमाफी योजनेमध्ये खावटी कर्जाचा समावेश नसल्याने हे खावटी कर्ज माफ व्हावे, अशी मागणी पवार यांच्याकडे करण्यात आली.

हेही वाचा - अरे बापरे ! यंदा काजू उत्पादनही घटणार 

सतीश सावंत यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने बुधवारी सातारा येथे पवार यांची भेट घेतली. एका कारखान्याच्या उद्घाटनाला पवार उपस्थित होते, यावेळी त्यांची भेट घेतली. या भेटीत सावंत यांच्यासोबत बॅंकेचे संचालक व्हिक्‍टर डान्टस, प्रमोद धुरी, निता राणे, प्रज्ञा परब, दिगंबर पाटील, गुलाबराव चव्हाण, प्रकाश गवस, एम. के. गावडे आणि बॅंकेचे अधिकारी प्रमोद गावडेही उपस्थित होते. ज्या शेतकऱ्यांनी कर्ज परतफेड केली आहे, त्यांना प्रोत्साहन अनुदान देण्यात यावे, अशी मागणी सावंत यांनी केली. त्याशिवाय शेतीपुरक व्यवसायांसाठी घेतलेले कर्जही माफ करावे, अशी मागणी या संचालकांनी केली. 

हेही वाचा - राष्ट्रवादीचे नगरसेवक म्हणाले, पक्षविरोधी कामाचे पुरावे दाखवा

यावेळी मे महिन्यात होऊ घातलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणूक रणनितीवरही चर्चा झाली. शरद पवार यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेची प्रगती अशीच सुरू राहणे आवश्‍यक आहे, सहकार क्षेत्राच्या विकासासाठी आपण आपल्या पाठीशी आहोत असा शब्द दिला. त्याशिवाय येणारी जिल्हा बॅंकेची निवडणूक शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या महाविकास आघाडीने लढवावी. त्यासाठी आपले संपूर्ण सहकार्य राहील, अशी सुचना त्यांनी केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकार, जिल्हा बॅंकेचे काम यावर यावेळी चर्चा झाली.