आंबोली : उसाची ३५ कांड्या असणारी नवी प्रजाती तयार करण्याचा प्रयत्न आहे. यामुळे ऊस क्षेत्रात क्रांती होईल. याशिवाय एआय तंत्रज्ञान (AI Technology) वापरून कमी पाणी आणि खताचा वापर करून जास्त साखर मिळवण्याच्या दृष्टीने प्रजाती विकसित करण्याबाबतही संशोधन केले जात आहे. या सगळ्याबाबत केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल, अशी माहिती माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी येथे दिली.