esakal | अकरावी प्रवेशाबाबत शिक्षक भारतीने केली आहे ही मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

Shikshak Bharati Demand On Eleventh Standard Admission Procedure

कोकणामध्ये गणेशोत्सव हा एकमेव सर्वात मोठा सण, प्रत्येक कोकणी माणूस मोठ्या भक्तिभावाने हा सण साजरा करीत असल्याने या प्रक्रिया व्यवस्थापनामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व संस्था, शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांना अडचणीचे होऊन फारच तारांबळ उडणार आहे.

अकरावी प्रवेशाबाबत शिक्षक भारतीने केली आहे ही मागणी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

तळेरे ( सिंधुदुर्ग ) - यावर्षीचे अकरावी प्रवेश शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक जाहीर झाले असून त्यानुसार ऐन गणेश चतुर्थीच्या काळामध्ये हा कालावधी आल्याने शाळा, संस्था, शिक्षक, विद्यार्थी व पालकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. कोकणात गणेशोत्सव हा सर्वात मोठा सण साजरा असल्याने सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील प्रवेश प्रक्रिया पुढे ढकल्याची मागणी शिक्षक भारतीने केली आहे. 

कोकणामध्ये गणेशोत्सव हा एकमेव सर्वात मोठा सण, प्रत्येक कोकणी माणूस मोठ्या भक्तिभावाने हा सण साजरा करीत असल्याने या प्रक्रिया व्यवस्थापनामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व संस्था, शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांना अडचणीचे होऊन फारच तारांबळ उडणार आहे. अशा आशयाचे लेखी निवेदन शिक्षक भारती प्रमुख कार्यवाह संजय वेतुरेकर यांनी शिक्षण उपसंचालक कोल्हापूर तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी सिंधुदुर्ग व रत्नागिरी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना दिले आहे. 

यात म्हटले आहे की, तरी कोकणातील जनतेच्या भावानांचा विचार करून आपल्या स्तरावर उचित कार्यवाही करण्यात यावी, असे वेतुरेकर यांनी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे केली आहे. शिक्षण उपसंचालकांबरोबर झालेल्या चर्चेत त्यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत या दोन्ही जिल्ह्यांतील अकरावीची प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलण्यात येईल, असे आश्‍वासन दिल्याची माहिती वेतुरेकर यांनी दिली. 

गणेशोत्सवात 21 ऑगस्टला हरतालिका, 22 ऑगस्टला गणेश चतुर्थी, 26 ऑगस्टला गौरीपूजन, 27 ऑगस्टला गौरी विसर्जन, व 1 सप्टेंबरला अनंतचतुर्दशी हे दिवस कोकणातील जनतेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. 20 ऑगस्ट पासूनची अकरावीची प्रवेश प्रक्रिया कार्यक्रम रद्द करून 3 सप्टेंबरपासून ही ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करावी. म्हणजेच 14 ते 20 ऑगस्ट व त्यानंतर 2 ते 14 सप्टेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया राबवावी जेणेकरून शासनचा आदेश प्राप्त झाल्यास 15 सप्टेंबरपासून हा वर्ग सुरू करण्यास कोणतीही अडचण राहणार नाही. 
- संजय वेतुरेकर, प्रमुख कार्यवाह, शिक्षक भारती