कोकण : शिवाजी महारांजांचा बालेकिल्ला असलेल्या किल्ले घेरायशवंतगडावर शिवजयंती साजरी

प्रमोद हर्डीकर
Friday, 19 February 2021

शिवाजी महारांजांचा हा बालेकिल्ला मानला जातो.माञ हा किल्ला पुर्णपणे दुर्लक्षित आहे.

साडवली (रत्नागिरी) : कोकण पर्यटन संस्था देवरूखतर्फे यावर्षी घेरायशवंतगडावर शिवजयंती साजरी करण्यात आली.राजापुर तालक्यापासुन ३० कि.मी.अंतरावर यशवंतगड गावात समुद्रकिनारी हा घेरायशवंतगड आहे.शिवाजी महारांजांचा हा बालेकिल्ला मानला जातो. माञ हा किल्ला पुर्णपणे दुर्लक्षित आहे. हा किल्ला काका पत्की यांना ईनाम म्हणुन मिळाला होता.या किल्ल्याची सातबार्‍यावर किल्ला म्हणुन नोंंद नाही.अरविंद पारकर यांच्या नावावर नोंद आहे.या किल्ला संवर्धनासाठी नाटे व साखरीनाटे मधील संस्था पुढाकार घेत आहेत.

कोकण पर्यटन संस्थेतर्फे सुरेंद्र माने,युयुत्सु आर्ते ,संजय सुर्वे,शेखर दळी,राजु वणकुद्रे,अंकुश घडशी,प्रमोद हर्डीकर,जावेद बोरकर,उदय नटे आदी उपस्थित होते.घेरा यशवतगड संवर्धनासाठी शिवसंघर्ष संघटनेचे मनोज आडविरकर,रवीकांत कुबडे,निलीन करंजवकर,नारायण ठाकुर,रमेश लांजेकर,तसेच ओमसाई समर्थ सामाजिक संस्थेचे भुषण नार्वेकर,नरेश साखरकर,उपस्थित होते.यावेळी शिवप्रतिमेचे पुजन करण्यात आले.

हेही वाचा- डेनिम आऊटफिट मध्ये परफेक्ट दिसायचे आहे तर खरेदी करताना ही घ्या काळजी -

यावेळी सुरेंद्र माने,युयुत्सु आर्ते यांनी दुर्लक्षित राहीलेल्या या घेरायशंवतगडाचे संवर्धन करण्यासाठी पुरातत्व विभागाने लक्ष घालण्याची इच्छा व्यक्त केली.या गडाची कुठे नोंदच नाही याबाबत शंका व्यक्त केली.स्थानिक संघटनांनी याचा पाठपुरावा करावा असे आवाहन केले.या गडासाठी कोकण पर्यटन संस्था पाठपुरावा करेल अशी ग्वाही दिली.या दौर्‍यात या टिमने किल्ला घेरायशवंतगड,आंबोळगड व पुर्णगडाला भेट दिली.

हेही वाचा- टवाळखोरांच्या धास्तीमुळे पालकच बनले मुलींचे बॉडीगार्ड -

पुर्णगड किल्ला आता नुतनीकरण पुर्ण झाले असले तरी गडप्रेमींसाठी या ठिकाणी स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही याबाबत गडप्रेमींनी नाराजी व्यक्त केली.पर्यटक प्रशांत जंगम(खेड)यांनी गडावर शिवलिंग असावे व भवानी मातेचे मंदिर असावे अशी मागणी केली.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Jayanti celebrations at Fort Ghera Yashwantgad sadavali ratnagiri historical marathi news