
लांबणीवर पडलेल्या निवडणुका कधीही होण्याची शक्यता निर्माण झाली आहे
निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचा नवा फॉर्म्युला, एका घरात एकच पद
रत्नागिरी : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. प्रभाररचना कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे राजकीय पक्षदेखील जागे झाले आहेत. पालिका निवडणुकांची तयारी करण्यासाठी बैठकांना पेव येऊ लागले आहे.
शहरात सर्वांत मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेनेही माजी नगरसेवक आणि इच्छुकांची तातडीची बैठक घेऊन राजकीय रणनीती ठरवण्यात आली; मात्र पक्षात इच्छुकांची घाऊकगर्दी असल्याने नाराजी उफाळण्याची शक्यता अधिक आहे. नाराजी थोपवण्यासाठी एका घरात एकच पद देण्याचा फॉर्मुल्या शिवसेनेने या निवडणुकीत राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी दुजोरा दिला.
हेही वाचा: प्रकाश आंबेडकरांना आठवलेंची ऑफर, म्हणाले तुमच्या नेतृत्वाखाली काम..
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभागरचना कार्यक्रमाचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाकडून नुकताच शासनाला देण्यात आला. त्यामुळे यापूर्वी राबवण्यात आलेल्या प्रभागरचना कार्यक्रमाला शासनाने स्थगिती दिली होती. लोकसंख्या वाढल्याने प्रभारसंख्याही वाढली आहे. प्रत्येक पालिकेत दोन ते तीन सदस्य वाढले आहेत; परंतु राज्य शासनाने प्रभागरचना कार्यक्रमाला स्थगिती दिली होती. त्यात ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने निवडणुका लांबणीवर पडल्या.
नुकताच सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक कार्यक्रम येत्या पंधरा दिवसांत जाहीर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने प्रभाररचना कार्यक्रम जाहीर केला आहे. १४ तारखेपर्यंत यावर हरकती मागविण्यात येणार आहे. त्यावर सुनावणी होऊन ७ जूनला अंतिम प्रभागरचना जाहीर होणार आहे. त्यामुळे लांबणीवर पडलेल्या निवडणुका कधीही होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हेही वाचा: सकल मराठाकडून तुळजापूर बंदची हाक; संभाजीराजेंचा अवमान प्रकरण
आयोगाच्या निर्णयानंतर निर्धास्त असलेले राजकीय पक्ष जागे झाले आहेत. निवडणुका कधीही लागणार असल्याने माजी नगरसेवक आणि इच्छुकांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. शहरामध्ये शिवसेनेची ताकद अधिक असल्याने ३० पैकी १९ म्हणजे सर्वांत जास्त नगरसेवक सेनेचे होते. त्या खालोखाल, भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस आहे. प्रत्येकी ६ सदस्य होते; आता प्रभागरचनेमध्ये सदस्यसंख्या वाढून ३२ झाली आहे. त्यामुळे काही प्रभागातील भाग बाजूला करून त्याचा नवीन १ प्रभाग तयार केला आहे.
या बदलाला सामोरे जाताना सेनेच्या माध्यमातून शहरात झालेला विकास घराघरात पोहचवण्याच्या सूचना आजच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांन देण्यात आल्या. सेनेत इच्छुकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे नाराजी अधिक उफाळून येण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी एका घरात एक पद देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे.
अपवादात्मक ठिकाणी बदल
सध्या सेनेमध्ये इच्छुकांची संख्या अधिक आहे. ज्यांना शब्द दिला तो परिस्थिती लक्षात घेऊन मागे घेतल्याने जवळचे काहीजण नेत्यांवर नाराज आहेत. निवडणुकीमध्ये सेनेला ही नाराजी थोपवताना दमछाक होणार असली तरी नेत्यांनी राजकीय गणिते तयार केली आहेत. त्यानुसार एका घरात एक पद हा फॉर्म्युला असला तरी अपवादात्मक ठिकाणी बदल करण्याचे संकेतही वरिष्ठांनी दिले. तेव्हाची परिस्थिती लक्षात घेऊन त्यावर निर्णय घेण्यात येईल, असे सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले.
हेही वाचा: शिवसेना आमदार रमेश लटके यांचे निधन, दुबईत हृदयविकाराचा झटका
Web Title: Shiv Sena News Formula Upcoming Election One Home One Post In Konkan
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..