शिवसंग्राम आपली ताकद भाजपच्या मागे उभी करणार

सुनील पाटकर
रविवार, 13 जानेवारी 2019

महाड : शिवसंग्रामने महाराष्ट्रात मराठा आरक्षणाबाबत आंदोलने करुन वातावरण निर्मिती केली होती. शरद पवार यांनी याबाबत शब्द दिल्याने आम्ही आंदोलने स्थगित केली होती. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने मराठा आरक्षण आणि शिवस्मारकाचा निर्णय न घेतल्यानेच आम्हाला भाजप सोबत जावे लागले. मात्र भाजपने या सर्व मागण्या पूर्ण केल्याने शिवसंग्राम आपली सर्व ताकद भाजपच्या मागे उभी करणार असल्याचे शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजीराव शिंदे यांनी सांगितले. पाचाड येथे राजमाता जिजाऊच्या समाधीस्थळी जयंती निमीत्त अभिवादन करण्यासाठी शिंदे या ठिकाणी आले होते. त्यावेळी त्यांनी हि माहिती दिली.
               
 आमदार विनेयक मेटे यांच्या शिवसंग्राम या संस्थेच्या 17 व्या वर्धापन दिनानिमीत्त 27 जानेवारीला औरंगाबाद येथे निर्धार महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या निर्धारमेळाव्यासाठी संस्थापक अध्यक्ष आ.विनायक मेटे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसुलमंत्री चंद्रकांतदाद पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजीराव शिंदे यांनी पाचाड येथील पत्रकार परिषदे दरम्यान दिली.

राजमाता जिजाऊंच्या जयंतीदिनी अभिवादन करण्यासाठी शिंदे पाचाड येथे आले होते. या वेळी  सोबत सरचिटणीस विक्रांत आंब्रे, जिल्हासरचिटणीस अनंत देशमुख उपस्थित होते.. भाजपने सर्व मागण्या पुर्ण करुन त्या प्रत्यक्षात आणल्याबद्दल मुख्यमंत्री फडणविसाचे त्यांनी आभार मानले. मात्र आ. विनायक मेटे यांच्या पक्षाला दिलेली काही वचने भाजपा पूर्ण करु शकली नसल्याची खंत शिंदे यांनी व्यक्त केली. मात्र तरीही भाजपचच सरकार येणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भारतीय संग्राम परिषद पक्ष लोकसभेच्या तिन आणि विधानसभेच्या नऊ जागा लढविणार असुन येत्या निवडणुकीत भाजपाला आमच्या पक्षाचा फायदा होणार आहे या साठीच हा निर्धार महामेळावा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.शेतकरी आणि शेतमजुर यांना पाच हजार पेन्शन योजना, बेरोजगागारांना नोकरी हमीचा कायदा आणि तीन हजार मासिक भत्ता तसेच नद्या जोड प्रकल्प ह्या प्रमुख मागण्या सरकारकडे असल्याची माहिती तानाजीराव शिंदे यांनी या वेळी दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivraj Sangram will strengthen its strength behind BJP : State President Tanaji Rao Shinde