esakal | तब्बल चार महिन्यानंतर धावली शिवशाही  
sakal

बोलून बातमी शोधा

shivshahi bus starting after four months

परतीच्या प्रवासासाठी नागरिकांनी लालपरीला पसंतीस दिली आहे.

तब्बल चार महिन्यानंतर धावली शिवशाही  

sakal_logo
By
सचिन माळी

मंडणगड - कोरोना लॉकडाऊनच्या चार महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर आज मंडणगड आगारातून धावणारी मंडणगड- बोरीवली शिवशाही प्रवाशांना घेवून पुन्हा मार्गस्थ झाली. मुंबईकडे जाणारी प्रवासी वाहतूक सेवा पुन्हा सुरु करण्यात आली. यावेळी आगार व्यस्थापक हनुमंत फडतरे, सभापती प्रणाली चिले, महेंद्र विखारे, हिराम दराणे, विनायक पवार, गजानन देघावे, युवराज जाधव, वालचंद गीते, व एस.टी.चालक वाहक व प्रवाशी उपस्थित होते. 

मंगळवारी सकाळी 10.15 वाजता पंचायत समिती सभापती प्रणाली चिले यांनी श्रीफळ वाढवून लालपरीच्या सेवेचा शुभारंभ केला. चालक रविंद्र हंगे आणि वाहक मच्छिद्र कांबळे यांनी प्रवाशांसहीत मंडणगड बसस्थानकातून बोरीवलीकडे प्रयाण केले. परतीच्या प्रवासात ही गाडी रात्री 9.00 वाजता बोरवली येथून दापोलीकडे प्रयाण करणार आहे. या सेवेचा लाभ प्रवाशांनी घ्यावा असे आवाहन आगारव्यवस्थापक हनुमंत फडतरे यांनी या निमीत्ताने केले आहे. 

परतीच्या प्रवासासाठी नागरिकांनी लालपरीला पसंतीस दिली आहे. मंडणगड आगारातून मुंबई व उपनगराकडे जाणाऱ्या 75 गाड्यांचे आरक्षण झाले आहे. मात्र पुणे मार्गावर अजूनही वाहतूक सुरु करण्यात आलेली नाही. चालू करण्यात आलेल्या गाड्यांच्या आगाऊ आरक्षणाची सोय मंडणगड आगाराने सुरु केली आहे. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी वेळास, निगडी, बाणकोट, पेवेकोंड, टाकवली मार्गावर लोकल फेऱ्या सुरू करण्यात आल्याने नागरिकांना सोयीचे झाले. मात्र प्रवासी संख्येला मर्यादा असल्याने अनेकांना याचा लाभ घेता येत नाही.

हे पण वाचारत्नागिरीत ग्रामीण पेक्षा शहरात कोरोनाचा कहर सुरूच 

सुरवातीच्या स्टॉप पासूनच गाड्या भरून येत असल्याने परिणामी शहराजवळील गावांतील नागरिकांना या सेवेपासून वंचित रहावे लागत आहे. अशांना मग खाजगी वाहतुकीवर अवलंबून रहावे लागत असून आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो आहे. 

हे पण वाचालांजा तालुक्यातील धक्कादायक प्रकार -  अवयव काढून परस्पर विल्हेवाट

संपादन - धनाजी सुर्वे 

loading image