मानगड किल्यावर राबविण्यात आली श्रमदान मोहीम 

अमित गवळे 
सोमवार, 11 मार्च 2019

पाली - दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे माणगाव तालुक्यातील निजामपूर जवळील मानगड किल्यावर रविवारी (ता.10) श्रमदान मोहीम राबविण्यात आली. दुर्गवीरांबरोबरच प्रशांत डिंगणकर यांची ४ वर्षाची कन्या गार्गी ही सुद्धा मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाली होती. 

मानगड मोहिमेत गडावरील राजसदर सदृश्य वास्तूचे संवर्धन करण्यात आले. या मोहिमेत अर्जुन दळवी, सचिन रेडेकरग, रविंद्र रावराणे, प्रशांत डिंगणकर, पवन सावेकर, मंगेश पडवळे, चेतन बिडकर, बाबूजी सुतार, चेतन राजगुरू व राज मेस्त्री या दुर्गवीरांनी श्रमदान केले. छोट्या गार्गीने यावेळी गडसंवर्धनाचे संस्कार घेतले. 

रायगडच्या संरक्षण प्रभावळीतील मानगड एक महत्वाचा किल्ला आहे. सन २०१० पासून दुर्गवीर प्रतिष्ठानचे येथे संवर्धन कार्य सुरू आहे. गुप्त दरवाजा, पायवाटा, टाकी, सदर, बुरुज अश्या अनेक वास्तू आजवर मोकळ्या करण्यात आल्या आहेत. तसेच माहिती व दिशादर्शक फलक बसविण्यात आले आहेत. कोणत्याही बांधकाम न करता आहे ती वास्तू जतन करण्यावर दुर्गवीर चा कायम भर राहिला आहे. 

सध्या दुर्गवीर तर्फे महाराष्ट्रातील मानगड, सुरगड, मृगगड, समानगड, वल्लभगड, कलानंदिगड, महिपालगड, साल्हेर, रामगड येथे सातत्याने काम सुरू आहे. तसेच मागील दहा वर्षांपासून विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येतात. ऐतिहासिक वस्तू प्रदर्शन, शस्त्र प्रदर्शन, गडकिल्ले छायाचित्रे प्रदर्शन याच्या माध्यमातून शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, तरुण यांना इतिहास गडकिल्ले याबाबत जागृत करण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shramdan campaign was executed at Mangad