International Dance Championship: नेपाळमध्ये आंतरराष्ट्रीय डान्स चॅम्पियनशिप जिंकत श्रीजा पाटीलची सुवर्णभरारी; तिरंगा अभिमानाने फडकला

नेपाळमधील आंतरराष्ट्रीय डान्स स्पोर्ट्स चॅम्पियनशिप २०२६ मध्ये सुवर्णपदक पटकावत श्रीजा पाटीलने जागतिक व्यासपीठावर तिरंगा अभिमानाने फडकवला
International Glory: Shrija Patil Wins Gold at International Dance Sports Championship 2026

International Glory: Shrija Patil Wins Gold at International Dance Sports Championship 2026

Sakal

Updated on

पाली : नेपाळमधील काठमांडू येथे पार पडलेल्या 'आंतरराष्ट्रीय डान्स स्पोर्ट्स चॅम्पियनशिप २०२६ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना पाली-सुधागडच्या श्रीजा संदेश पाटील हिने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आणि मानाचे सुवर्णपदक आपल्या नावावर केले. या जागतिक स्तरावरील दैदिप्यमान यशाबद्दल श्रीजाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. नुकतेच पाली-सुधागडचे तहसीलदार उत्तम कुंभार यांच्या हस्ते तिचे विशेष कौतुक व अभिनंदन करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com