अंधाऱ्या परिसरातील सिद्धगिरी मठाने उजळवल्या प्रकाशवाटा....

मुझफ्फर खान
Saturday, 25 July 2020

‘निसर्ग’ चक्रीय वादळाने कोकणात जो हाहाकार माजला, त्यातून कोकणवासीय अजूनही सावरत आहेत.

चिपळूण (रत्नागिरी) : ‘निसर्ग’ चक्रीय वादळाने कोकणात जो हाहाकार माजला, त्यातून कोकणवासीय अजूनही सावरत आहेत. पुनर्वसन कार्यक्रमचा पुढचा भाग  म्हणून आज सिद्धगिरी मठाचे मठाधिपती काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या हस्ते कोकणातील दापोली व मंडणगड तालुक्यातील अनेक गावात ३०० सोलर लॅम्पचे मोफत वाटप करण्यात आले. 

हेही वाचा- कोकणात  आधि कोरोना नंतर सारी आणि आता लेप्टोचा शिरकाव ;  ओटवणेत आढळला लेप्टोचा रुग्ण... -

निसर्ग वादळग्रस्त कोकणवासियांना मदतीसाठी अनेक सामाजिक संस्था हातभार लावत होत्या, त्यात श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठ, कणेरी, कोल्हापूर यांच्यावतीने आपल्या शेकडो स्वयंसेवकांसह पुनर्वसनाचे कार्य केले होते. यात अनेक घरांची पुनः उभारणी करण्यात आली होती. याच पुनर्वसनाचा एक भाग म्हणून श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठाच्या काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून डीलाईट सोलारचे चे मेनेजिंग डिरेक्टर कमल लाथ  यांच्यावतीने स्वखर्चातून २०० सोलर लॅम्प व रोटरी क्लब कोल्हापूर यांच्यावतीने १०० सोलर लॅम्प मठाकडे सुफुर्त करण्यात आले.

या ३०० सोलर लॅम्पचे वितरण दापोली तालुक्यातील पाजपंढरी, आडे, उंटबर, केळशी तसेच मंडणगड तालुक्यातील वाल्मिकी नगर (वेसवी), घोसाळे ( आदिवासी वाडी), रातांबेवाडी, आसवले आदी गावातील गरजू आपतग्रस्तांना वाटप करण्यात आले. 

हेही वाचा- रेल्वे मंत्रालयाला निवेदन सादर ; गणेश उत्सवासाठी कोकण रेल्वे गाड्या हाच पर्याय -

विजेची समस्या असताना सोलार लाईट चे वितरण आदिवासी आणि कोळी बांधवांना करण्यात आले यापुढे हि हे मदतकार्य सुरूच राहणार असल्याचे मठाच्या वतीने सांगण्यात आले. या मदतकार्यासाठी कमलजी लाथ, रोटरी क्लब कोल्हापूर, अलकाताई मांडके केशवस्मृती यांचे मोलाचे योगदान व सहकार्य लाभले. या मदतकार्याचे नियोजन सिद्धगिरी मठाच्यावतीने प्रमोद शिंदे, प्रदीप जाधव  आणि श्विक्रम पाटील यांनी केले.

 संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Siddhagiri Math Kadsiddheshwar Swamiji distribution of 300 solar lamps mandangad and dapoli in ratnagiri