रेल्वे मंत्रालयाला निवेदन सादर ; गणेश उत्सवासाठी कोकण रेल्वे गाड्या हाच पर्याय

तुषार सावंत
Saturday, 25 July 2020

रेल्वेमंत्र्यांनी कोकण रेल्वे सुरू करावी अशी मागणी प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे....

कणकवली  (सिंधुदुर्ग) : येत्या 22 ऑगस्टपासून गणेश उत्सव साजरा होत आहे. मुंबईसह राज्यातील विविध भागातून चाकरमानी कोकणातील गावाकडे येण्यासाठी कोकण रेल्वे हाच पर्याय आहे. रेल्वेमंत्र्यांनी कोकण रेल्वे सुरू करावी अशी मागणी प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात आली असून मुंबईत  मोहीम राबविण्यात आली आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयात संघटनेच्या वतीने निवेदनही देण्यात आले आहे.

 
कोकणात मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव साजरा केला जातो. दरवर्षी मध्य व  पश्चिम रेल्वेकडून कोकण रेल्वेमार्गावर विविध विशेष गाड्या सोडल्या जातात यामुळे कोकणात 15 ते 20 लाख चाकरमानी गावाकडे येत असतात. यंदा कोरोनाव्हायरस पार्श्वभूमीवर अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत.  कोकणातील बंद घरात जाऊन पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव हा सण कसा साजरा करावा असा प्रश्न मुंबईकर चाकरमान्यांना पडला आहे. त्यात बहुतांशी ग्रामपंचायतींच्या मागण्या या चाकरमान्यांच्या दृष्टिकोनातून  सोईच्या  नाहीत.  

हेही वाचा- राजकीय कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक :  शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या संपर्कातील यादी वाढणार...सविस्तर वाचा.. -

कोरोनाव्हायरस प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने 14 दिवस क्वारटाईन  अशा सूचना केल्या आहेत. मात्र चाकरमान्यांना ते शक्य नाही त्यातच एसटीची सुविधा किंवा सार्वजनिक वाहतूक सुरू नसल्याने खाजगी गाड्यांतून आर्थिक दृष्ट्या प्रवास करणे ही परवडणारे नाही. त्यामुळे कोकण रेल्वे हाच चाकरमान्यांसाठी उत्कृष्ट पर्याय ठरेल. शासनाने आपले नियम निकष निश्चित करून मुंबई ते सावंतवाडी पर्यंत विशेष गाड्या सोडाव्यात अशी  मागणी मुंबईच्या प्रवासी संघटनांनी केली आहे. याबाबतचे निवेदनही रेल्वे मंत्रालयाला देण्यात आले आहे.

हेही वाचा- आरोग्यचा कारभार : स्वॅब घेतलेल्या ट्यूब फुटल्या , आमदार वैभव नाईक यांच्या संपर्कात आलेल्या त्या ४० जणांची केली  होती तपासणी.... - ​

कोकणसाठी विशेष गाड्या सोडा 
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वेने जादा गाड्या सोडाव्यात त्याचे वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर करावे अशी मागणी मुंबईच्या प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुजित लोंढे यांनी रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे.  चाकरमान्यांना रेल्वे हाच योग्य पर्याय ठरेल रेल्वेतून मुंबईकडे जाणे सोयीचे ठरेल आणि परतीचा प्रवासही रेल्वेने झाला तर कोरोनाव्हायरस प्रादुर्भाव रोखण्यात यश येईल असे मतही लोंढे यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा- कोरोनानंतर सारीचे आक्रमण : सात दिवसांत या रोगाचे रुग्ण झाले दुप्पट : १३ जणांचा मृत्यू... - ​

सोशल मीडिया निषेध मोहीम 
मुंबईत कोकण रेल्वेच्या प्रवासी संघटनेच्या वतीने प्रवाशांना रेल्वे मागणीसाठी काळे टीशर्ट त्यावर कोकणवर अन्यायकारक असा मजकूर लिहून फोटो रेल्वे मंत्रालयास पाठवले जात आहे  परप्रांतीय मजुरांनी केला मोफत प्रवास आम्हा कोकणवाशींयांवर अन्याय का अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.

 संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Konkan Railway is the only option for Ganesh festival Submission statement the Ministry of Railways