राज्य स्केटिंग स्पर्धेत सिमरन गवसला सुवर्णपदक 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 डिसेंबर 2019

पुणे येथे 14 ते 23 नोव्हेंबर या काळात 5 ते 7 या वयोगटातील मुलांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा झाल्या. त्यात 300 आणि 600 मीटर तिहेरी फेरीत प्रथम येत सुवर्णपदक पटकावले. तिला

दोडामार्ग ( सिंधुदुर्ग ) - भिकेकोनाळच्या सिमरन कुणाल गवसने राज्य स्केटिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेतील यशानंतर ती आता 17 व 18 डिसेंबरला विशाखापट्टणम (ओरिसा) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.

हेही वाचा - कुस्ती स्पर्धेत रेश्मा मानेस ब्राँझपदक 

पुणे येथे 14 ते 23 नोव्हेंबर या काळात 5 ते 7 या वयोगटातील मुलांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा झाल्या. त्यात 300 आणि 600 मीटर तिहेरी फेरीत प्रथम येत सुवर्णपदक पटकावले. तिला कोच अमित भोळे, वडील कुणाल, आई मानसी, काका, आजी, आजोबा यांचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन लाभले. ती पुणे येथे पहिलीत शिकत आहे. दोडामार्ग येथील हर्षल फीड्‌सचे मालक सूर्यकांत गवस यांची ती नात. येत्या 17 व 18 डिसेंबरला विशाखापट्टणम (ओरिसा ) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झाल्याची माहिती सूर्यकांत गवस यांनी दिली. तिच्या देदीप्यमान यशाबद्दल शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबूराव धुरी, कळणे भिकेकोनाळ येथील ग्रामस्थांनी आणि तिच्या शाळेतील शिक्षकांनी तिचे अभिनंदन केले. 

हेही वाचा - चक्रीवादळाचा धोका ओळखण्यासाठी किनारपट्टीवर हे उपकरण 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Simran Gavas Wins Gold Medal In State Skating Competition