esakal | चक्रीवादळाचा धोका ओळखण्यासाठी किनारपट्टीवर 'हे' उपकरण
sakal

बोलून बातमी शोधा

Satellite system project launch program on ratnagiri coast

नैसर्गिक आपत्तीची माहिती संबंधित गावाला तातडीने मिळावी आणि संभाव्य धोका टाळता यावा यासाठी केंद्र सरकारच्या नैसर्गिक आपत्ती विभागाने हा उपक्रम हाती घेतला आहे. 

चक्रीवादळाचा धोका ओळखण्यासाठी किनारपट्टीवर 'हे' उपकरण

sakal_logo
By
मुझफ्फर खान

रत्नागिरी - सातत्याने होणारी वादळे, चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनारपट्टीचा भाग सॅटेलाईट प्रकल्पाद्वारे जोडण्याचा प्रयत्न केंद्रीय आपत्ती निवारण विभागाकडून सुरू आहे. नैसर्गिक आपत्तीची माहिती संबंधित गावाला तातडीने मिळावी आणि संभाव्य धोका टाळता यावा यासाठी केंद्र सरकारच्या नैसर्गिक आपत्ती विभागाने हा उपक्रम हाती घेतला आहे. 

चक्रीवादळाचा सतत असतो धोका

अरबी समुद्रात चक्रीवादळ झाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनारपट्टीलाही त्याचा धोका असतो. अरबी समुद्रात यावर्षी सातत्याने वादळ झाले. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन नुकतेच क्‍यार व महा असे वादळ तयार झाले होते. क्‍यार वादळामुळे अवकाळी पाऊस झाला. 
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. नंतर महावादळ झाले. त्यापासून बचाव करण्यासाठी प्रशासनाने रेड अर्लट जारी केले होते.

हेही वाचा - स्वतंत्र कोकण राज्य मागणीचे कारण काय ? 

आपत्तीचा इशारा देण्याचा प्रयत्न

गुहागर, दापोली, रत्नागिरीला समुद्र किनारपट्टी लाभली आहे. येथील बहुतांशी गावे समुद्रालगत आहेत. त्यांचे समुद्रातील चक्रीवादळांपासून नुकसान होण्याची शक्‍यता जास्त असते. त्यावर वेळीच मात करणे शक्‍य व्हावे, चक्रीवादळामुळे निर्माण होणाऱ्या आपत्तीची माहिती वेळीच मिळावी आणि त्यावर तत्काळ उपायोजना कता याव्यात यादृष्टीने प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी समुद्र लगतची गावे सॅटेलाईटद्वारे जोडली जाणार आहेत. त्या गावात वॉकीटॉकी दिली जाणार आहेत. गावात असलेल्या महसूल, ग्रामविकास, बंदर व मत्स्य खात्याच्या कार्यालयात वॉकीटॉकीद्वारे संकटाची माहिती दिली जाईल. समुद्रातील चक्रीवादळांसारख्या संकटासह अन्यही नैसर्गिक संकटाची माहिती तत्काळ दिली जाणार आहे. मच्छीमार, तेथील लोकवस्ती आणि बंदरांचेही संरक्षण होणार आहे. 

जाणून घ्या - कोकणवासियांना दिलेली आश्वासने शिवसेना पाळणार का ? 

समुद्रालगतच्या गावांवर सॅटेलाइटची नजर

समुद्रालगतची गावे सॅटेलाइटद्वारे जोडण्याचे काम एका एजन्सीला देण्यात येणार आहे.  आचारसंहितेमुळे हे काम थांबले होते. पुढील महिन्यात ते सुरू होईल. समुद्रालगतची गावे सॅटेलाइट प्रकल्पाद्वारे जोडल्यानंतर संबंधित गावांशी वेळीच संपर्क करून संकटाची माहिती देता येणे शक्‍य होणार आहे.
 

loading image