Sindhudurg: ९११ बालके कुपोषणाच्या उंबरठ्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुपोषण

सिंधुदुर्ग : ९११ बालके कुपोषणाच्या उंबरठ्यावर

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात अद्यापही ९११ एवढी बालके कमी वजनाची, तर ९२ बालके तीव्र कमी वजनाची असल्याचे महिला व बालकल्याण विभागाच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शून्य ते सहा वयोगटातील ३८ हजार ५८९ बालके आहेत.

या बालकांपैकी ३८ हजार ५१६ बालकांचे सप्टेंबर २०२१ अखेर वजन घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यातील मिळून सप्टेंबर २०२१ अखेर कमी वजनांच्या ( मॅम ) बालकांची संख्या ९११ आहे. यापैकी १२० बालकांमध्ये सुधारणा झाली आहे. तीव्र कमी वजनाच्या ( सॅम ) बालकांची संख्या ९२ एवढी आहे. यापैकी ११ बालकांमध्ये सुधारणा झाली असल्याची माहिती महिला व बालविकासच्या अहवालावरून स्पष्ट झाली आहे.

जिल्ह्यात एक हजार ५९१ कार्यरत अंगणवाडी केंद्रे आहेत. जिल्ह्यातील आठही तालुक्यातील मिळून शून्य ते सहा वयोगटातील ३८ हजार ५८९ बालके आहेत. यामध्ये सावंतवाडी तालुक्यातील सहा हजार ४८४, कणकवली सहा हजार ८३९, मालवण तीन हजार ८३८, वेंगुर्ले तीन हजार २७४, कुडाळ आठ हजार ८४, वैभववाडी एक हजार ८५५, देवगड पाच हजार ५१५, दोडामार्ग दोन हजार ७०० बालकांचा समावेश आहे.

या सर्वेक्षित बालकांपैकी ३८ हजार ५१६ बालकांचे सप्टेंबर २०२१ अखेर वजन घेण्यात आले आहे. यामध्ये सावंतवाडी तालुक्यातील सहा हजार ४८४, कणकवली सहा हजार ८३९, मालवण तीन हजार ८३८, वेंगुर्ले तीन हजार २७४, कुडाळ आठ हजार ५५, वैभववाडी एक हजार ८५५, देवगड पाच हजार ५१५, दोडामार्ग दोन हजार ६५६ बालकांचा समावेश आहे.

हेही वाचा: T20 WC : पाकिस्तानचा खेळ खल्लास! नवा गडी नवं राज्य!

जिल्ह्यात सप्टेंबर २०२१ अखेर तीव्र कमी वजनाच्या (मॅम) बालकांची संख्या ९११ आहे. यापैकी १२० बालकांमध्ये सुधारणा झाली आहे. कुडाळ तालुक्यातील कमी वजन असणाऱ्या बालकांचा आकडा दोनशेच्या बाहेर आहे.

कमी वजन असणाऱ्या बालकांमध्ये सावंतवाडी १७८, कणकवली १३५, मालवण ७६, वेंगुर्ले १०३, कुडाळ २०१, वैभववाडी २५, देवगड १२५, दोडामार्ग ६८ बालकांचा समावेश आहे. यापैकी १२० बालकांमध्ये सुधारणा झाली आहे. यात सावंतवाडी १९, कणकवली नऊ, मालवण १२, वेंगुर्ला १७, कुडाळ ४१, वैभववाडी आठ, देवगड १२, दोडामार्ग दोन बालकांचा समावेश आहे. तसेच, जिल्ह्यात सप्टेंबर २०२१ अखेर तीव्र कमी वजन असलेल्या (सॅम) बालकांची संख्या ९२ आहे. यापैकी ११ बालकांमध्ये सुधारणा झाली आहे.

तीव्र कमी वजन असणाऱ्या बालकांमध्ये सावंतवाडी १९, कणकवली १९ , मालवण सात, वेंगुर्ले पाच, कुडाळ २२, वैभववाडी दोन, देवगड १५, दोडामार्ग तीन बालकांचा समावेश आहे. यापैकी सात बालकांमध्ये सुधारणा झाली आहे. यामध्ये सावंतवाडी चार, कणकवली दोन, कुडाळ दोन, वैभववाडी दोन, देवगड एक बालकांचा समावेश आहे.

हेही वाचा: एक कॅच सुटला अन् पाकिस्तानचं झालं T20 वर्ल्ड कपमधून 'पॅक-अप'

महिला व बालकल्याण विभागाच्या सर्वेक्षणात आढळलेल्या कमी वजनाच्या मुलांमध्ये सुधारणा व्हावी, यासाठी जिल्ह्यात बालसंगोपन व उपचार केंद्राची स्थापना करून त्यांच्यावर उपचार केले जातात. कमी वजनाच्या मुलांची काळजी घेतली जाते. यामुळे आतापर्यंत अनेक मुलांच्या वजनात सुधारणा होऊन ती सर्वसाधारण श्रेणीत आली आहेत. यापुढेही कमी वजनाच्या मुलांच्या तब्येतीत सुधारणा होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्यांच्या पालकांनाही आहाराबाबतचे मार्गदर्शन करण्यात येत आहे.

- शर्वानी गावकर, महिला व बालकल्याण सभापती, सिंधुदुर्ग

loading image
go to top