esakal | Sindhudurg: चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळ शनिवारपासून सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्ग विमानतळ

कुडाळ : चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळ शनिवारपासून सुरू

sakal_logo
By
अजय सावंत

कुडाळ : चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळ शनिवारपासून (ता.9) सुरू होत असून त्याची लँडिंग चाचणी आज घेण्यात आली, अशी माहिती लोकसभा शिवसेना गटनेते खासदार विनायक राऊत यांनी दिली.

कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता 9 ला सिंधुदुर्ग विमानतळ उद्घाटन सोहळा हा निमंत्रितांच्या उपस्थितीत होत आहे. येथील सुरक्षा इतर सुविधा यांबाबत त्या-त्या अधिकारी वर्गाशी चर्चा केली जात आहे. दोन दिवसांपूर्वीच खासदार राऊत यांनी या ठिकाणी पाहणी केली. रस्ते दुरुस्ती कामाला सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. प्रोटोकॉलप्रमाणे राज्य, केंद्राचे मंत्री, प्रमुख अधिकारी यांच्यासाहित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही प्रमुख मंडळी निमंत्रित असणार आहेत.

हेही वाचा: सांगली : महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा पेच कायम

9 ला एअर अलायन्सचे 72 सीटचे जे विमान येणार त्याची आज सिंधुदुर्ग विमानतळावर लँडिंग चाचणी घेण्यात आली. हे विमान आज गोवा येथुन सिंधुदुर्ग विमानतळावर आले. यामध्ये पायलट व तंत्रज्ञ होते. हेच विमान दिवसा मुंबई ते सिंधुदुर्ग विमानतळ असा प्रवास करणार आहे, अशी माहिती खासदार राऊत यांनी दिली. पाट परुळे रस्ता दुरुस्ती कामाला सुरुवात झाली असून काम अंतिम टप्प्यात असल्याचेही त्यांनी सांग्तले.

असे होणार उद्घाटन

सिंधुदुर्ग विमानसेवेचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी केंद्रीय हवाई मंत्री आदित्यराज सिंधिया, केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री आदिती तटकरे, खासदार सुरेश प्रभू, खासदार विनायक राऊत, आमदार बाळाराम पाटील, दीपक केसरकर, वैभव नाईक, निरंजन डावखरे, नितेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत तसेच अधिकारी वर्ग, पत्रकार विमानातून येणारे प्रवाशी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

loading image
go to top