

Anti-Drug Strategy
sakal
ओरोस: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे आणि पोलिस विभागाच्या समन्वयाने काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या अमली पदार्थविरोधी मासिक आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.