जनतेच्या आग्रहाखातर भाजपने यांना दिली उमेदवारी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

परब म्हणाले, नगराध्यक्ष निवडणुक मी लढवावी , अशी नागरिकांची इच्छा होती . नागरिकांची मागणी लक्षात घेता मी पक्षाकडे उमेदवारी मागितली

सावंतवाडी (सिंधुदूर्ग) : येथील जनतेच्या आग्रहाखातर आणि पक्षाने उमेदवारी दिल्याने मी येथील नगराध्यक्ष पोट निवडणुक लढवित आहे ; मात्र महाविकास आघाडीच्या नावाखाली दीपक केसरकर हे कॉंग्रेस राष्ट्रवादीला लटकवित शिवसेनेच्याच कार्यकर्त्याला उमेदवारी देणार , अशी टिका भाजपचे उमेदवार संजू परब यांनी आज येथे केली.

श्री. परब आपल्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते . यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक राजू बेग , सुधीर आरीवडेकर , सुधन बांदीवडेकर , दिलीप भालेकर , सत्यवान बांदेकर , शैलेश तावडे , केतन आजगावकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा - ‘या’ जिल्ह्यात टंचाईवर पाण्यासारखा खर्च
 

नागरिकांची इच्छा  परब यांनी  निवडणुक  लढवावी

श्री. परब म्हणाले, 'येथील नगराध्यक्ष निवडणुक मी लढवावी , अशी नागरिकांची इच्छा होती . नागरिकांची मागणी लक्षात घेता मी पक्षाकडे उमेदवारी मागितली. उद्या (ता.12) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. तत्पुर्वी भाजपा कार्यालयाकडे कार्यकर्ते जमणार आहेत. त्यानंतर संपुर्ण शहरात रॅली काढून व सर्वाचे आर्शिवाद घेणार आहे .

उपस्थित मान्यवर

उमेदवारी अर्ज दाखल करताना माजी राज्यमंत्री तथा आमदार रविंद्र चव्हाण , आमदार नितेश राणे , माजी खासदार निलेश राणे , भाजप प्रदेश चिटणीस राजन तेली , भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार , जिल्हा बॅंक संचालक अतुल काळसेकर आदी उपस्थित राहणार आहे. 

हेही वाचा - लईभारी ! महापुरात बुडूनही उसाचे ३८ गुंठ्यात १४७ टन उत्पादन
शिवसेनेच्याच कार्यकर्त्याला उमेदवारी

परब पुढे म्हणाले, "माजी पालकमंत्री केसरकर यांनी या निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार देणार असे सुतोवात केले आहे ; मात्र माझा राजकिय अनुभव लक्षात घेता ते कॉंग्रेस व राष्ट्रवादीला झुलत ठेवत शिवसेनेच्याच कार्यकर्त्याला उमेदवारी देणार आहेत . त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत केसरकर जरी विधानसभा निवडणुकीच्या पडलेल्या मताची बेरीज घालत असले तरी त्यानंतर पुलाखालुन बरेच पाणी गेले आहे.''

परब म्हणाले मी  काही बोलणार नाही

भाजपाकडून बंडखोरी करत अन्नपुर्णा कोरगावकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे . याबाबत श्री. परब यांना विचारले असता ते म्हणाले, ''सौ. कोरगावकर यांच्याबाबत जबाबदारी जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी घेतली आहेत. त्यामुळे मी त्यावर काही बोलणार नाही.'' भाजप पृरस्कृत राजन तेली यांना शहरात मतदान का कमी पडले ? असा प्रश्‍न माजी जिल्हा परिषद पदाधिकारी सुदन बांदिवडेकर यांना विचारला असता त्यावेळचा कौल आम्ही मान्य केला आहे ; मात्र ती निवडणुक व आत्ताच्या निवडणुकीत फरक आहे तो दिसुन येणार आहे.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sindhudurg BJP Has Given Candidacy For Advice The People