सिंधुदुर्ग भाजप महिला मोर्चाच्या पहिल्या टप्प्यातील कार्यकारीणीत `यांचा` समावेश  

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 जुलै 2020

जिल्ह्याचा विचार करता महिला संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टिकोनातून पक्षाची पुढील ध्येय धोरणे असणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी उज्वला गॅस योजना, धान्य, जनधन खात्यावर पाचशे रुपये जमा अशा विविध योजना आणल्या आहेत.

कुडाळ ( सिंधुदुर्ग ) - जिल्ह्यात घराघरात भाजप पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकार व भाजपच्या योजना तळागाळात महिलांपर्यंत पोचविणार. सर्वांच्या सहकार्याने महिला संघटना वाढविणार असल्याचे महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे यांनी आज येथे सांगितले. त्यांनी भाजप महिला मोर्चाच्या पहिल्या टप्प्यातील जिल्हा कार्यकारीणी जाहीर केली. 
तेरसे यांनी आज पत्रकार परिषद घेतली.

यावेळी तेरसे म्हणाल्या, ""पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून आज कार्यकारणी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यात तीन विधानसभा मतदार संघात जिल्हा उपाध्यक्ष सरचिटणीस व सदस्य पदांची नियुक्ती केलेली आहे. ही निवड पहिल्या टप्प्यातील असून दुसऱ्या टप्प्यातील निवड लवकरच करण्यात येणार आहे.

जिल्ह्याचा विचार करता महिला संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टिकोनातून पक्षाची पुढील ध्येय धोरणे असणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी उज्वला गॅस योजना, धान्य, जनधन खात्यावर पाचशे रुपये जमा अशा विविध योजना आणल्या आहेत.

त्याचबरोबर इतरही योजना तळागाळात पोहोचवून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी पक्षाचे नेते खासदार नारायण राणे, माजी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी आमदार प्रमोद जठार, अतुल काळसेकर, आमदार नितेश राणे यांच्यासह जिल्ह्यातील जेष्ठ महिला पदाधिकारी यांच्या माध्यमातुन महिला संघटना वाढविणार आहे. 

भाजप महिला मोर्चा कार्यकारिणी अशी -
जिल्हा उपाध्यक्ष - सावी लोके, रश्‍मी लुडबे, प्रियांका नाईक. सरचिटणीस - भाग्यलक्ष्मी साटम, रेखा काणेकर, सारीका काळसेकर. चिटणीस - शुभांगी पवार, मनस्वी घारे, आरती पाटील, लक्ष्मी आरोंदेकर, सुजाता मणेरीकर, कायम निमंत्रित - प्रज्ञा ढवण, राजश्री धुमाळे, स्नेहा कुबल, प्रणिता पाताडे, अस्मिता बांदेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य - सायली सावंत, सुजाता हळदिवे, स्वाती राणे, रंजना कदम, प्रियांका साळस्कर, रत्नप्रभा वळंजू, गितांजली कामत, स्नेहा सावंत, सरोज परब, माधवी बांदेकर, उन्नती धुरी, शर्वाणी गावकर, समिधा नाईक, पूजा कर्पे, किर्ती भगत, वंदना किनळेकर, निकिता परब, आकांक्षा शेटकर. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sindhudurg BJP Mahila Morcha Executive Members Name Announced