

Officials and volunteers participate in the beach cleanliness
sakal
ओरोस : स्वच्छ समुद्र किनारे हा जिल्ह्याचा आरसा आहे. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्याने येथे येणारे देशी-विदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात समुद्र किनाऱ्यांना भेट देतात. जर आपण पर्यटकांना स्वच्छ व सुंदर समुद्र किनारे देऊ शकलो, तर भविष्यात याहून अधिक पर्यटक जिल्ह्याला भेट देतील, असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी व्यक्त केला.