सिंधुदुर्ग : कांदळवनांचे रोजगारातून संवर्धन

१०१० जणांना मदत; सिंधुदुर्गात पाच वर्षांत जैवविविधता संरक्षणाला मूर्त रूप
 कांदळवन
कांदळवन sakal

वैभववाडी: युएनडीपी, वनविभाग आणि कांदळवन कक्ष यांच्यासह विविध संस्थांच्या माध्यमातून गेल्या पाच-सहा वर्षांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या कांदळवन संरक्षण आणि संवर्धनाच्या कामाला मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे. या प्रकल्पातर्गंत मत्स्यपालनातून १२६ गटांच्या १०१० लाभार्थ्यांना रोजगार प्राप्त झाला आहे. कांदळवन संवर्धनाच्या दृष्टीने जिल्ह्यात झालेला हा खूप मोठा सकारात्मक बदल म्हणता येईल.

राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन उद्या (ता.५) आहे. विविधतेने नटलेल्या महाराष्ट्राला ७२० किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे. राज्यातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी,रायगड, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगरे आणि पालघर या जिल्हयामध्ये विस्तीर्ण किनारपट्टी आहे. हे सर्व किनारे जैवविविधतेने नटलेले आहेत. यामध्ये लहान मोठे वृक्ष, झुडपे, पक्षी, प्राणी, किडे यांची मिळुन कांदळवने अर्थात खारफुटी परिसंस्था तयार होते. राज्यात खारफुटीच्या एकुण २० प्रजाती आढळतात. एक एकर कांदळवनातुन दरवर्षी साडेसात हजार टन इतका पालापाचोळा निर्माण होतो. त्याचा फायदा मत्स्यउत्पादन वाढीसाठी होतो. याशिवाय खारेपाणी, वादळे रोखण्यासाठी कांदळवनाचा उपयोग होतो.

धुप थांबविण्यासाठी कांदळवनाचा मोठा फायदा होतो; परंतु याच कांदळवनाचे संरक्षण आणि संवर्धनाचा मुद्दा काही वर्षापुर्वी पुढे आला होता. त्यामुळे ही कांदळवने टिकविण्यासाठी शासनाने धोरण निश्चित केले. शासनाच्या युएनडीपी आणि एमपीईडीए, कांदळवन कक्ष, वनविभाग यांना स्थानिक लोकांच्या सहकार्यानेच कांदळवन संवर्धन शक्य असल्याची खात्री पटल्यामुळे या प्रकल्पांतर्गंत कांदळवन परिसरातील महिला बचत गटांसाठी प्रकल्प राबविण्यास सुरूवात केली. कांदळवन क्षेत्रात महिला बचत गटांना खेकडा पालन, कालवे पालन, शिणाने पालन, शोभिवंत मत्स्यपालन असे प्रकल्प ९० टक्के अनुदानावर सुरू केले. या प्रकल्पांतर्गत महिला बचत गटांच्या महिलांना केरळ, तामिळनाडु, आंध्रप्रदेश येथे नेऊन प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण घेऊन आलेल्या महिलांपैकी काहींनी खेकडा पालन,

काही गटांनी कालवे, शिपंले पालन सुरू केले. या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरच महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. ११० महिला बचत गट हे प्रकल्प सुरू केले असून त्यातून लाखो रूपयांची उलाढाल दरवर्षी होते. उत्पादीत मत्स्यउत्पादनाला स्थानिक आणि गोवा बाजारपेठेत मोठी मागणी आहे. या प्रकल्पातर्गंत ४१ कांदळवन सहव्यवस्थापन समित्या गठित करण्यात आल्या. या समित्यांच्या माध्यमातून कांदळवन सरंक्षित झाली आहेत. या प्रकल्पामुळे सुमारे ४० हेक्टरवर कांदळवन वृक्षांची लागवड झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com