Crime News: नराधमाचं ४ वर्षीय पोटच्या लेकीसोबत धक्कादायक कृत्य, शिक्षक बापाला अटक; घटनेनं खळबळ

Sindhudurg Crime: शिक्षक असलेल्या वडिलांवर स्वतःच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे.
Sindhudurg Crime

Sindhudurg Crime

ESakal

Updated on: 

वैभववाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका सव्वाचार वर्षीय चिमुरडीवर तिच्याच बापाने लैंगिक अत्याचार केल्याची फिर्याद पीडित मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात दिली. सिंधुदुर्ग पोलिसांनी पोक्सोंतर्गत त्या शिक्षक पित्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा संतापजनक प्रकार शुक्रवारी (ता. २०) दुपारी दोनच्या सुमारास एका गावात घडला. पोलिसांनी संबंधितास अटक केली असून, न्यायालयाने त्याला चार दिवसांची कोठडी सुनावली आहे.

Loading content, please wait...