Sindhudurg District Chief Sanjay Padate Resignsesakal
कोकण
ठाकरे शिवसेनेला आणखी एक धक्का; 'या' जिल्हाप्रमुखांचा राजीनामा, शिंदे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता!
Sindhudurg District Chief Sanjay Padate Resigns : आज जिल्हाप्रमुख असलेल्या पडते यांनी राजीनामा दिल्याने या पक्षाला आणखी एका धक्क्याला सामोरे जावे लागत आहे. त्यांनी कुडाळ एमआयडीसी विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
Summary
लवकरच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका (Zilla Parishad Election) लागणार असल्याने आणखी काही धक्के बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कुडाळ : सिंधुदुर्गातील ठाकरे शिवसेनेला (Uddhav Thackeray Shiv Sena) धक्क्यावर धक्के बसत आहेत. या पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते (Sanjay Padate) यांनी पक्षांतर्गत घडामोडींमुळे पदाचा राजीनामा दिला. २२ तारखेनंतर पुढील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते शिंदे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
