

Sindhudurg Zilla Parishad health committee raises concerns over delayed medicine procurement and shortages at primary health centres.
esakal
सिंधुदुर्गनगरी : प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये काही औषधांचा तुटवडा असतानाच औषध खरेदीची फाईल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसाठी पडून असल्याची बाब आरोग्य समिती सभेत उघड झाली. याबाबत सभेत सभापतीसह सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच दोन दिवसांत फाईल मंजूर न झाल्यास पालकमंत्र्यांकडे तक्रार करू आणि ग्रामीण भागातील जनता कार्यालयात आणून बसवू, अशा इशारा सदस्या सावी लोके यांनी सभेत दिला.