सिंधुदुर्ग : भाजपने वेंगुर्लेसाठी किती निधी दिला? शिवसेनेचा सवाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्ग : भाजपने वेंगुर्लेसाठी किती निधी दिला? शिवसेनेचा सवाल

सिंधुदुर्ग : भाजपने वेंगुर्लेसाठी किती निधी दिला? शिवसेनेचा सवाल

sakal_logo
By
दिपेश परब

वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) : सावंतवाडी, वेंगुर्ले विधानसभा मतदार संघात दोनवेळा जनतेने धूळ चारलेल्या तसेच आजन्म माजी आमदार म्हणून मिरवणाऱ्या व विधानपरिषदेच्या मागच्या दाराने जाणाऱ्या राजन तेली यांना प्रचंड मताधिक्याने दोनवेळा खासदार झालेल्या विनायक राऊत यांच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकारी नाही. आतापर्यंत येथील नगरपरिषदेला शिवसेनेच्या माध्यमातून सुमारे १२१ कोटी ५५ लाख एवढा निधी विविध हेडमधून मिळाला असल्याने भाजपच्या नेत्यांनी नगरपरिषदेला किती निधी दिला, याचा विचार करावा. नंतरच तेली यांनी खासदार राऊत यांच्यावर टीका करावी, अशी प्रत्युत्तर शिवसेनेचे तालुकाप्रमुख यशवंत परब यांनी पत्रकार परिषदेतून दिले.

श्री. तेली यांनी काल (ता.१०) खासदार राऊत यांनी नगरपरिषदेवर केलेल्या भ्रष्टाचाराला उत्तर देत शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. या टीकेला आज शिवसेना तालुकाप्रमुख परब यांनी प्रतित्युत्तर दिले आहे. यावेळी उपजिल्हाप्रमुख सुनील डुबळे, बाळा दळवी, शहरप्रमुख अजित राऊळ, जिल्हा कार्यकारणी सदस्य सचिन वालावलकर, शहर समन्वयक विवेक आरोलकर, मीतेश परब, सुयोग चेंदवणकर, दिलीप राणे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: मुंबई महापालिकेला अध्यादेशाची प्रतीक्षा; निवडणूक लांबणीवर पडणार ?

यावेळी श्री. परब म्हणाले, वेंगुर्ले नगरपरिषदसाठी शिवसेनेच्या माजी पालकमंत्री दीपक केसरकर, विद्यमान पालकमंत्री उदय सामंत यांनी २०१४ पासून ते २०२१ पर्यंत दिलेला जो निधी तो खासदार राऊत हे शिवसेना पक्षाचे सचिव व मार्गदर्शक असल्याने त्यांच्या आदेशान्वये देण्यात आला आहे. याची पूर्ण माहिती तेली यांनी घ्यावी व नंतरच निधीबाबत खासदारांवर बोलावे. २०१४ पासून ते २०२१ पर्यंत अग्नी सुरक्षा अभियान अंतर्गत १ कोटी, नागरी दलित वस्ती पाणीपुरवठा अंतर्गत ९ लाख, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत सुमारे ९४ कोटी ८७ लाख, आमदार निधी अंतर्गत ३७ लाख ५० हजार, पर्यटन निधी अंतर्गत २ कोटी ४७ लाख, निशाण तलावाची उंची वाढवणे ७ कोटी ५४ लाख, मधुसूदन कालेलकर सभागृहासाठी विविध हेडमधून सुमारे १२ कोटी, भाजी मार्केट साठी २ कोटी ७५ लाख व मच्छिमार्केट साठी १ कोटी असा मिळून सुमारे १२१ कोटी ५५ लाखाचा निधी हा माजी पालकमंत्री केसरकर हे युतीच्या काळात वित्त व नियोजन मंत्री असल्याने नगरपरिषदेला देणे शक्य झाले. त्यामुळे हा निधी कोणच्या माध्यमातून आला याच भान ठेऊन तेली यांनी वक्तव्य करावे.

loading image
go to top