मुंबई महापालिकेला अध्यादेशाची प्रतीक्षा; निवडणूक लांबणीवर पडणार ? | BMC Election Update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BMC

मुंबई मनपाला अध्यादेशाची प्रतीक्षा; निवडणूक लांबणीवर पडणार?

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई : राज्य मंत्रीमंडळाने (Maharashtra ministry) मुंबईतील नऊ प्रभाग वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अद्याप याबाबत अध्यादेश प्रसिध्द करण्यात आलेला नाही. हा अध्यादेश (ordinance) तसेच निवडणूक आयोगाचे (election commission) सुधारीत निर्देश यानंतरच पुढील प्रक्रिया सुरु करता येऊ शकते. असे पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून (bmc authorities) सांगण्यात आले. आता पालिकेला पुन्हा सर्व आखणी नव्याने करावी लागणार असल्याने फेब्रुवारी 2022 मध्ये होणारी निवडणूक लांबणीवर (election postpone issue) पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: पुजा ददलानी पुन्हा गैरहजर; तब्येतीचं कारण देऊन चौकशी टाळली

राज्य मंत्रीमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत मुंबईतील महानगरपालिकेचे नऊ प्रभाग वाढविण्याचा निर्णय झाला आहे. यामुळे नगरसेवकांची संख्या 227 वरुन 236 वर जाणार आहे. प्रामुख्याने पूर्व आणि पश्‍चिम उपनगरातील प्रभागांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या भागात लोकसंख्या वाढली असून लोकसंख्येच्या आधारावर प्रभाग रचना होणार आहे. मात्र, याबाबत अद्याप राज्य सरकारकडून अध्यादेश प्रसिध्द केला नाही.

राज्य सरकारचा अध्यादेश प्रसिध्द झाल्यावर या प्रक्रियेत काही निर्णय घेता येत नाही.असे पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. सरकारचा अध्यादेश जाहीर होईल. त्याच बरोबर प्रभाग रचना कशी करावी याबाबत निवडणूक आयोगाकडून सुचना येतील. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल.असे सांगण्यात आले.महानगर पालिकेची निवडणुक फेब्रुवारी 2022 मध्ये होणार होती. मात्र,आता ही निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

प्रशासक नेमला जाईल?

नवी मुंबईसह काही महानगरपालिकेच्या निवडणुका 2020 मध्ये होणार होत्या. मात्र, कोविडमुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या.ती महानगर पालिका बरखास्त करुन तेथे प्रशासक नेमण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेत 1990 ते 1992 या दोन वर्षांसाठी मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र आता निवडणुकीला विलंब झाल्यास पालिकेला मुदतवाढ मिळणार का प्रशासक नेमला जाईल,अशी चर्चा आता पालिका वर्तुळात सुरु आहे.

loading image
go to top