

Vaibhavwadi karul Dam Drowning News three death
esakal
Sindhudurg tragic incident : करूळ जामदारवाडी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या गावातील सात जणांपैकी तीन मुलींचा बुडून मृत्यू झाला. ही घटना आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. यामुळे करूळ गावावर शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये तन्वी अनंत माळकर (वय १६), ऋतिका संतोष पाटील (१८) आणि स्वरा संदीप सुर्वे (११) या तिघींचा समावेश असून त्या करूळ भोयडेवाडी येथील रहिवासी आहेत.