Who is Firoz Baba?
esakal
सावंतवाडी : माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेने दिलेल्या तक्रारीनंतर अघोरी कृत्यांमध्ये सहभागी असलेला कोलगाव येथील फिरोज शेख ऊर्फ फिरोज बाबा व त्याला साथ देणारा मुख्य साथीदार राम यल्लाप्पा वडार ठाणे पोलिसांच्या अटकेत (Firoz Baba arrest Thane Police investigation) आहेत. त्यांच्या पोलिस कोठडीत आज १८ जुलैपर्यंत वाढ केली आहे. या प्रकरणाशी संबंध जोडला गेल्याने जिल्ह्यातील तीन राजकीय पदाधिकाऱ्यांना ठाणे पोलिसांनी नोटीस बजावली. त्यामुळे खळबळ उडाली आहे.