जांभेकर पत्रकार पुरस्कारांचे फलटण येथे मंगळवारी वितरण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

ज्येष्ठ पत्रकार शंकर पाटील पुरस्कृत साहस पत्रकारिता दर्पण पुरस्कार - संतोष पवार (प्रतिनिधी, सकाळ, माथेरान, जि. रायगड), भाऊ तोरसेकर (मुंबई), भोसले, सुक्रुत खांडेकर, विजय बावीस्कर, ज्येष्ठ पत्रकार व जलनीती तज्ज्ञ सुधीर भोंगळे (मुंबई), महाराष्ट्र राज्य प्रसारमाध्यम व वृत्तपत्रे अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदू जोशी (मुंबई) यांना ‘दर्पण’ जीवन सन्मान पुरस्कार देण्यात येणार आहेत. 

देवगड - महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीने मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रात  केलेल्या ‘दर्पण’ पुरस्कार उपक्रमास यावर्षी २५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने ‘रौप्यमहोत्सवी दर्पण’ व ‘विशेष दर्पण’ जीवन सन्मान पुरस्कार वितरण कार्यक्रम महाराष्ट्र दिनादिवशी मंगळवारी दुपारी ३:३० वाजता फलटण येथील श्रमिक पत्रकार भवन सभागृहात ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. विश्‍वजित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ आहेत, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष बापूसाहेब जाधव व विजय मांडके यांनी दिली. 

भारती विद्यापीठ पुणे यांच्या प्रायोजित सहकार्याने पुरस्कार वितरण होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर पाटील पुरस्कृत साहस पत्रकारिता दर्पण पुरस्कार - संतोष पवार (प्रतिनिधी, सकाळ, माथेरान, जि. रायगड), भाऊ तोरसेकर (मुंबई), भोसले, सुक्रुत खांडेकर, विजय बावीस्कर, ज्येष्ठ पत्रकार व जलनीती तज्ज्ञ सुधीर भोंगळे (मुंबई), महाराष्ट्र राज्य प्रसारमाध्यम व वृत्तपत्रे अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदू जोशी (मुंबई) यांना ‘दर्पण’ जीवन सन्मान पुरस्कार देण्यात येणार आहेत. 

अन्य दर्पण पुरस्कारार्थी याप्रमाणे - ज्येष्ठ संपादक पुरस्कार वासुदेव कुलकर्णी (सातारा), दर्पण पुरस्कार पश्‍चिम महाराष्ट्र विभाग - हरिष पाटणे (सातारा), दर्पण पुरस्कार मराठवाडा विभाग - प्रद्युम्न गिरीकर (हिंगोली), दर्पण पुरस्कार विदर्भ विभाग - प्रशांत देशमुख (वर्धा), दर्पण पुरस्कार कोकण विभाग - उत्तम वाडकर (सावंतवाडी), दर्पण पुरस्कार उत्तर महाराष्ट्र विभाग - अनंत पाटील (अहमदनगर), बृहन्महाराष्ट्र विभाग - भालचंद्र शिंदे (कलबुर्गी, जि. गुलबर्गा). बृहन्महाराष्ट्र जिल्हा वृत्तपत्र संपादक संघ पुरस्कृत पत्रमहर्षी वसंतराव काणे पत्रकार साहित्यिक पुरस्कार - डॉ. जगदीश कदम, विशेष दर्पण पुरस्कार - भाऊसाहेब कदम (कोल्हापूर), दत्ता मर्ढेकर (वाई), प्रताप महाडिक (कडेगाव, जि. सांगली), संपत मोरे (पुणे)यांना सन्मानित केले जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sindhudurg News Jambhekar Journalist Award distribution in Phaltan