डावखरेंच्या विजयाने टीकाकारांना उत्तर - राजन तेली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 जून 2018

सावंतवाडी - कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपचे निरंजन डावखरे यांना मतदारांनी विजयी करून टीकाकरांना उत्तर दिल्याचे भाजप प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

येथील विश्रामगृहावर ते बोलत होते. भाजप तालुकाध्यक्ष महेश सारंग, मनोज नाईक, आनंद नेवगी, राजन म्हापसेकर, दादू कविटकर उपस्थित होते.

तेली म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टीम देशात व राज्यात उत्तम प्रकारे काम करत आहे. त्यामुळे मतदारांनी भाजपला स्वीकारले. आमदार डावखरे पदवीधरांच्या प्रश्‍नाला वेळ देतील. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला आमदार निधी आणि आपला वेळ ठेवावा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत. सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्‍यातील विजेच्या प्रश्‍नासंदर्भात आम्ही कुडाळ येथे अधिकाऱ्यांना भेटलो. त्यांनी दोन्ही तालुक्‍यांचे प्रश्‍न मार्गी लावण्याचे ठरले. उद्या (ता. ३०) आणि रविवारी ते अनुक्रमे दोडामार्ग, सावंतवाडी तालुक्‍यात भेट देऊन विजेचे प्रश्‍न सोडविणार आहेत. विजेच्या प्रश्‍नासंदर्भात १ जुलैला सावंतवाडीत येथे दुपारी तीन वाजता वरिष्ठ अधिकारी भेट देणार आहेत.’’

भाजपच्या टीम वर्कचा विजय
भाजपने टीम वर्क करून मतदान नोंदणी व मतदान हक्क बजावण्यासाठी मेहनत घेतली. महेश सारंग, श्री. देसाई, सुधीर दळवी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी टीम वर्क केले. त्यामुळे त्यांचा विजय झाल्याचे तेली यांनी सांगितले.

Web Title: Sindhudurg News Rajan Teli Comment