उंबर्डेत रस्त्याशेजारील 11 टपऱ्या हटविल्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

वैभववाडी - उंबर्डे रस्त्यालगतच्या अकरा टपऱ्या आज कडक पोलिस बंदोबस्तात प्रशासनाने हटविल्या. कारवाई सुरू असताना एका टपरी चालक महिलेची प्रकृती खालावली. 

वैभववाडी - उंबर्डे रस्त्यालगतच्या अकरा टपऱ्या आज कडक पोलिस बंदोबस्तात प्रशासनाने हटविल्या. कारवाई सुरू असताना एका टपरी चालक महिलेची प्रकृती खालावली. 

उंबर्डे एसटीच्या निवारा शेडजवळ रस्त्याच्या दुतर्फा अकरा टपऱ्या कित्येक वर्षांपासून होत्या. टपऱ्या सरकारी जागेत असल्याचा दावा करीत एका ग्रामस्थाने तहसीलदारांकडे तक्रार केली होती. त्यानतंर तहसीलदार जाधव यांनी सर्व टपऱ्या हटविण्याची नोटीस दिली होती; परंतु कुणीही टपऱ्या हटविल्या नव्हत्या. 

अखेर आज सकाळी अकरा वाजता श्री. जाधव पोलिस बंदोबस्तात बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना घेऊन उंबर्डेत पोहोचले. तेथील अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरवात केली. काही टपऱ्या हटविल्यानंतर सुहास दळवी यांची टपरी हटविण्याची प्रक्रिया सुरू होती. त्या वेळी त्यांची पत्नी सुप्रिया यांची प्रकृती खालावली. त्यांना तत्काळ तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. प्रशासनाने तासाभराच्या कारवाईत रस्त्यालगतची सर्व अतिक्रमणे हटविली.

 

Web Title: Sindhudurg News removal of Encroachment in Umbarde