नगरपंचायत फंडाची प्रांत, मुख्याधिकाऱ्यांकडून उधळपट्टी - समीर नलावडे

राजेश सरकारे
गुरुवार, 28 जून 2018

कणकवली - कणकवली नगरपंचायत निवडणुकीत प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आणि मुख्याधिकारी यांनी नगरपंचायत फंडाची उधळपट्टी केली आहे. मागील निवडणुकीपेक्षा चौपटीने खर्च वाढवला. यात कणकवलीकरांच्या करातून जमा झालेला नगरपंचायत फंड रिकामी झाला आहे. या प्रकाराची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

येथील आपल्या दालनात श्री. नलावडे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी गटनेते संजय कामतेकर, उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, बांधकाम सभापती अभिजित मुसळे, आरोग्य सभापती ऍड.विराज भोसले, माजी नगरसेवक किशोर राणे, अजय गांगण आदी उपस्थित होते.

नलावडे म्हणाले, 2013 ची कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी नगरपंचायत इमारतीचा वापर झाला होता. कर्मचारी देखील नगरपंचायतीचे होते. मात्र यंदा प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आणि मुख्याधिकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रिया तहसील कार्यालयात नेली. तेथे अवास्तव खर्च करून, त्याची बिले नगरपंचायत फंडातून वसूल करण्यात आली आहेत.

बिलांचे आकडे डोळे दिपवणारे
नगरपंचायत निवडणुकीसाठी टेबल, खुर्च्या आणि डोलीसाठी तब्बल 7 लाख 84 हजार रुपये, तर केवळ चहापानासाठी 3 लाख 64 हजार रुपये लावण्यात आला आहे. तसेच व्हिडिओग्राफीसाठी 4 लाख 34 हजार, झेरॉक्‍स व स्टेनशरीसाठी 3 लाख 27 हजार रुपये मोजण्यात आले आहेत. टेबल, खुर्ची, व्हिडिओ कॅमेरा तसेच झेरॉक्‍स मशीन विकत घेतली तरी एवढा खर्च येणार नाही असे श्री. नलावडे म्हणाले.

यंदाच्या नगरपंचायत निवडणुकीसाठी सर्वच गोष्टींवर चौपटीने खर्च करण्यात आला. एवढेच नव्हे तर आम्ही नगराध्यक्ष पदाचा कार्यभार घेण्यापूर्वीच सर्व 28 लाखाचा खर्च अदा देखील करण्यात आला. या खर्चामध्ये निश्‍चितपणे गौडबंगाल आहे. जिल्हाधिकारी आणि निवडणूक आयोगाकडे याबाबतची तक्रार आम्ही करणार आहोत.
- समीर नलावडे,
नगराध्यक्ष कणकवली

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sindhudurg News Sameer Nalavade Press