Sindhudurg Rain : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने आंबा बागायतदारांत चिंता; पुढील दोन दिवस पावसाचे सावट

Pre-Monsoon Rain Hits Sindhudurg District : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसामुळे वादळी वाऱ्यासह जोरदार सरी कोसळल्या. या बदलत्या हवामानामुळे आंबा व काजू बागायतदारांना मोठ्या नुकसानीची चिंता निर्माण झाली आहे.
pre monsoon rain in sindhudurg district

pre monsoon rain in sindhudurg district

esakal

Updated on

वैभववाडी (सिंधुदुर्ग) : जिल्ह्यातील घाटपायथ्याच्या गावांना काल सायंकाळी पूर्वमोसमी पावसाचा तडाखा (Sindhudurg Rain News) बसला. करूळ, भुईबावडा परिसराला पावसाने वादळी वाऱ्यांसह झोडपून काढले. दरम्यान, पहाटे वैभववाडी, मालवण व देवगड तालुक्यांच्या काही भागांत हलक्या सरी झाल्या. सायंकाळी उशिरा सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com