El Nino Impact on Agriculture : 'एल निनो'चा थेट परिणाम! पुढील दोन महिने पाऊस घटणार; हवामान खात्याच्या अंदाजाने बळीराजाची चिंता वाढली

Sindhudurg rainfall deficit and El Nino impact on rice crop : सिंधुदुर्गात पावसाची 29.18 टक्के तूट असून एल निनोचा प्रभाव सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये कायम राहण्याची शक्यता आहे.
Will El Nino reduce rainfall in Sindhudurg?

Will El Nino reduce rainfall in Sindhudurg?

esakal

Updated on

वैभववाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. मॉन्सूनच्या उत्तरार्धात एल निनोचा प्रभाव टिकून राहणार आहे. त्यामुळे भात पिकाला फुलोरा येण्याच्या कालावधीत पावसाचे प्रमाण आणखी कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला (Sindhudurg Weather News) आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर भात पीक टिकविण्याचे मोठे आव्हान उभे राहणार आहे. दरम्यान, यंदा पावसाच्या सरासरीत २९.१८ टक्के इतकी मोठी तूट आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com