Why did tourists clash at Sawantwadi Waterfall?
esakal
कणकवली (सिंधुदुर्ग) : तालुक्यातील सावडाव धबधबा ठिकाणी जाणाऱ्या रस्त्यावर पर्यटन कराच्या मुद्द्यावरून दाजीपूर, तसेच इचलकरंजी येथील पर्यटक आणि स्थानिकांमध्ये वादंग (Sindhudurg waterfall tourist clash) झाला. यात पर्यटकांनी कर वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली. स्थानिकांवर दगड भिरकावले. दुपारी साडेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला. इतर पर्यटक पळून गेले, तर एका पर्यटकाला ग्रामस्थांनी पोलिसांच्या स्वाधीन केले.