

पत्नी नातेवाईकांच्या हाती लागलेल्या व्हिडिओत धक्कादायक बाबी समोर
esakal
Sindhudurg Banda Crime : बांदा-मुस्लिमवाडी येथील आफ्ताफ कमरुद्दिन शेख (वय ३८) यांनी आज पहाटे घरात गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान येथील उपजिल्हा रुग्णालयातून गोवा मेडिकल कॉलेज, बांबोळी येथे नेत असताना त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, शेख यांनी आत्महत्येपूर्वी बनवलेला व्हिडिओ नातेवाइकांच्या हाती लागला. त्यात काही जणांची नावे घेत ते आपल्या आत्महत्येस जबाबदार असल्याचा उल्लेख असल्याने नातेवाईक संप्तत झाले. त्या सर्वांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका भाऊ अब्दुल रझाक शेख यांनी घेतली. त्यामुळे वातावरण चिघळले. रात्री उशिरापर्यंत संबंधितावर गुन्हा दाखल न झाल्याने उपजिल्हा रुग्णालयामध्ये मुस्लिम समाज बांधवांनी मोठी गर्दी केली होती.