esakal | Sindhudurga : शेतमांगर कोसळल्याने हानी
sakal

बोलून बातमी शोधा

kokan

Sindhudurga : शेतमांगर कोसळल्याने हानी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ओटवणे : पावसाचा अधूनमधून जोर वाढत असल्याने ओटवणे-कापईवाडी येथील अंकुश लक्ष्मण नाईक यांच्या शेतमांगराची एक बाजू कोसळली. यात त्यांचे सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले. हा प्रकार काल (ता.११) रात्रीच्या सुमारास घडला. या शेतमांगरात एका बाजूला गाईसह वासरू दावणीला बांधले होते; परंतु दुसऱ्या बाजूचे छप्पर कोसळल्यामुळे अनर्थ टळला.

येथील कापईवाडी येथे श्री. नाईक यांच्या घरानजीकच त्यांचा शेतमांगर आहे. शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास काही तरी कोसळल्याचा मोठा आवाज झाला. गाय व वासरू मोठमोठयाने हंबरू लागले. श्री. नाईक हे शेत मांगराच्या दिशेने आले असता त्यांना शेत मांगराची एक बाजू कोसळल्याचे दृष्टीस पडले; मात्र शेत मांगरातील गाय व वासरू सुखरूप असल्याचे पाहून त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला; मात्र गवत पावसात भिजल्याने नुकसान झाले. लाकडी छपरासह नळे जमीनदोस्त झाल्याने सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले.

भरपाईची मागणी

दरम्यान, आज सकाळी शेत मांगरावर प्लास्टिक कपडा घालून छप्पराची तात्पुरती डागडुजी करण्यात आली. या घटनेबाबत श्री. नाईक यांनी ओटवणे सरपंचा उत्कर्षा गावकर आणि तलाठी भक्ती सावंत यांचे लक्ष वेधले आहे. तसेच भरपाई देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली आहे.

loading image
go to top