esakal | Sindhudurga : पालकमंत्री सामंत आजपासून सिंधुदुर्ग दौऱ्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

uday samanat

Sindhudurga : पालकमंत्री सामंत आजपासून सिंधुदुर्ग दौऱ्यावर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सिंधुदुर्गनगरी : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत उद्या (ता. १२) व १३ रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

दौरा असा- उद्या (ता. १२) सकाळी ८.४५ वाजता विमानाने गोवा-दाभोळी येथे आगमन व मोटारीने वेंगुर्लेकडे, सकाळी ११.१५ वाजता शासकीय विश्रामगृह, वेंगुर्ले येथे आगमन. '

सकाळी ११.३० वाजता वेंगुर्ले येथून मोटारीने चिपी विमानतळाकडे, दुपारी १२.३० वाजता चिपी विमानतळ उद्‍घाटन कार्यक्रमाच्या अनुषंगाने आढावा बैठक, दुपारी १ वाजता पत्रकार परिषद, दुपारी १.३० वाजता सावंतवाडीकडे, दुपारी ३ वाजता मुंबई विद्यापीठाच्या सावंतवाडीतील उपकेंद्र उद्‍घाटन कार्यक्रमास उपस्थिती, सायंकाळी ४.४५ वाजता वेंगुर्लेत.

सोमवारी (ता.१३) सकाळी ९.४५ वाजता तळगाव-मालवणकडे, सकाळी १०.३० वाजता विनायक राऊत यांच्या निवासस्थानी गणेश दर्शन. सकाळी सकाळी ११ वाजता जिल्हा नियोजनअंतर्गत प्राप्त होणाऱ्या निधीच्या नियोजनाबाबत ओरोसमध्ये आढावा.

दुपारी १२ वाजता कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर केलेल्या उपाययोजना व लसीकरणाबाबत आढावा, दुपारी १२.३० वाजता प्रकल्प आढावा बैठक, दुपारी १ वाजता जिल्ह्यातील विश्रामगृहांच्या प्रलंबित कामांबाबत आढावा बैठक, दुपारी १.३० ते २ राखीव, दुपारी २ वाजता ओरोस-सिंधुदुर्ग येथून वेंगुर्लेकडे, सायंकाळी ५ वाजता कणकवलीकडे, सायंकाळी ६.१५ वाजता संदेश पारकर यांच्या निवासस्थानी श्री गणेश दर्शन.

loading image
go to top